सेनापती बापट रस्त्यावरील पदपथावरील ई-टॉयलेट गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:44 IST2026-03-20T10:44:33+5:302026-03-20T10:44:49+5:30

ओम सुपरमार्केट पुढे बहिरट चौकात नवीन तंत्रनिकेतन कार्यालयासमोर ही असेच ई-टॉयलेट होते.

pune news e-toilet on the sidewalk on Senapati Bapat Road missing | सेनापती बापट रस्त्यावरील पदपथावरील ई-टॉयलेट गायब 

सेनापती बापट रस्त्यावरील पदपथावरील ई-टॉयलेट गायब 

औंध : सेनापती बापट रस्त्यावरील श्री म्हसोबा मंदिरासमोर लक्ष्मी छाया इमारती शेजारी स्टील पत्र्याचे ई-टॉयलेट होते. तेथील टॉयलेट काढून त्याठिकाणी गांडूळ खत प्रकल्पाचा फलक लावला आहे. तेथे लवकरच गांडूळ खत विक्री केंद्र सुरू होणार असल्याची माहिती संबंधित संस्थेने फोन केल्यावर दिली, तसेच त्या शेजारी असलेल्या बसथांब्यात खुर्च्या नाहीत. त्यामुळे नागरिक तेथे बसत नाही व टॉयलेट काढल्याचा प्रकार कोणाच्या लक्षात येत नाही.            

ओम सुपरमार्केट पुढे बहिरट चौकात नवीन तंत्रनिकेतन कार्यालयासमोर ही असेच ई-टॉयलेट होते. ते काढून तेथे जागा सपाट करण्यात आली आहे. तेथे एखादा पथारी व्यावसायिक आपला व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. दोन्ही टॉयलेट मुख्य रस्त्यालगत व गर्दीच्या आवश्यक ठिकाणी आहेत. आसपास शैक्षिणक संस्था व खासगी कार्यालये आहेत. या ठिकाणी परत ई-टॉयलेट उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.  

बहिरट चौक व श्री म्हसोबा मंदिरासमोर यापूर्वी प्रमाणे ई-टॉयलेट उभारावे ती आवश्यक आहेत. तेथे इतर काही उद्योग करू नये अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. - प्रवीण डोंगरे, अध्यक्ष, स्व. दत्तू डोंगरे महाराज फाउंडेशन

Web Title : पुणे: सेनापती बापट मार्ग के फुटपाथों से ई-शौचालय गायब।

Web Summary : सेनापती बापट मार्ग पर म्हसोबा मंदिर और बहिरट चौक के पास के ई-शौचालय गायब हो गए हैं। एक की जगह खाद परियोजना है, दूसरी जगह खाली है। नागरिकों ने अधिक यातायात और संस्थानों के कारण पुनर्स्थापना की मांग की।

Web Title : E-toilets vanish from Senapati Bapat Road pavements in Pune.

Web Summary : E-toilets near Mhasoba Temple and Bahirat Chowk on Senapati Bapat Road have disappeared. A composting project replaces one, while another spot is cleared. Citizens demand their reinstatement due to high traffic and nearby institutions.