विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी...! एमपीएड, एमएड सीईटी प्रवेश नोंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:56 IST2026-01-21T11:56:16+5:302026-01-21T11:56:38+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी...! एमपीएड, एमएड सीईटी प्रवेश नोंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेतल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) आणि मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणीची मुदत २० जानेवारीपर्यंत हाेते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याची नाेंदणी ५ जानेवारीला सुरू झाली आहे.
आजपर्यंत एमपीएडसाठी १०३८, तर एमएडसाठी १२३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएडची प्रवेश परीक्षा २४ मार्च आणि फिल्ड परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. एमएडची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होईल. यासाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील वर्षी या दोन प्रवेश परीक्षेत ६१९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी बंधनकारक असून, ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजिलॉकरद्वारे तयार करावा. अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.
-------
मागील तीन वर्षांच्या नाेंदी
प्रवेश परीक्षा : २०२३-२४ : २०२४-२५ : २०२५-२६
एमपीएड : २०८८ : २६८६ : २३८४
एमएड : ३०६६ : २९८५ : ३८०९
----------