पुण्यात भरदिवसा दरोडा..! गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:36 IST2025-07-01T14:35:39+5:302025-07-01T14:36:52+5:30

- या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

pune news daytime robbery in Pune Owner of Gajanan Jewellers in Vadgaon attacked and looted the employee with a sickle | पुण्यात भरदिवसा दरोडा..! गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट

पुण्यात भरदिवसा दरोडा..! गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट

पुणे : शहरातील सुरक्षेच्या दाव्यांना धक्का देणारी घटना मंगळवारी दुपारी घडली. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला. या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांनी थेट दुकानात शिरून, काहीही न बोलता कोयत्याने सपासप वार करत दुकानातील लोकांना जखमी केले. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज उचलून ते पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, या घटनेनंतर नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. भरदिवसा, मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात दरोडा पडतो, आणि पोलिसांना याची खबर लागते तेव्हा सगळं उरकून दरोडेखोर पसार होतात, ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्याचा दावा केला असला, तरी दरवाढती गुन्हेगारी आणि दिवसाढवळ्या अशा घटनांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Web Title: pune news daytime robbery in Pune Owner of Gajanan Jewellers in Vadgaon attacked and looted the employee with a sickle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.