दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

By नम्रता फडणीस | Updated: April 3, 2025 17:28 IST2025-04-03T17:11:26+5:302025-04-03T17:28:13+5:30

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलिस कोठडी हवी असल्यामुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलिस कोठडीसाठी ...

pune news Court rejects Dattatreya Gade's application for police custody again | दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलिस कोठडी हवी असल्यामुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलिस कोठडीसाठी केलेला अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळला. गाडेच्या अटकेची परवानगी न मिळाल्याने थ्रीडी इफेक्ट वापरून पोलिस तपास करण्यास काही अंशी अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, गाडेला दि. २८ फेब्रुवारी रोजी अटक केल्यानंतर त्याला दि. १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलिस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिले नसल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.

एका २६ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या व उसाच्या शेतात लपून राहिलेल्या गाडे याला दि. २८ च्या रात्री सव्वाएकच्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान त्याच्यावर यापूर्वी सहा लूटमारीचे गुन्हे देखील दाखल असल्याचे समोर आले होते. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचणीबरोबर डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहे. पोलिस कोठडीच्या दरम्यान त्याला घटनास्थळावर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता, त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आले. या दरम्यान तो ज्यांना ज्यांना भेटला, त्यातील खटल्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यात आले आहे.

थ्री-डी तंत्रज्ञान वापरून गाडेच्या लकबीची होणार होती चाचपणी

पोलिसांनी या प्रकरणात आधुनिक थ्री-डी तंत्रज्ञान वापरून पोलिस त्याची अधिक चौकशी करणार होते. परंतु, यामध्ये त्याची चालण्याची स्टाईल तसेच त्याच्या छोट्या छोट्या लकबी या माध्यमातून तपासून पुराव्यांमध्ये त्याचा अंतर्भाव केला जाणार होता. मात्र, न्यायालयातून गाडेच्या ताब्यालाच परवानगी न मिळाल्याने या कार्यवाहीला काही काळ खंड पडला आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडता यावी व गुन्ह्यातील तपासातील काही बाबींवर विचारपूस करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी पोलिसांना हवी होती. त्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे बचाव पक्षाचे वकील ॲॅड. वाजीद खान बिडकर यांनी सांगितले.

Web Title: pune news Court rejects Dattatreya Gade's application for police custody again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.