जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:34 IST2026-02-24T20:22:43+5:302026-02-24T20:34:22+5:30

जलजीवन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठकीत ते बोलत होते.

pune news complete the water supply projects under the Jaljeevan Yojana on time | जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा

जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा

पुणे : जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची भौतिक पूर्णता पूर्ण करून मंजुर पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करून भौतिकदृष्ट्या कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जलजीवन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, “ हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. प्रलंबित एफएचटीसी असलेल्या योजनांना प्राधान्य देण्यात यावे. ज्या योजनांमध्ये नळ जोडणी अद्याप प्रलंबित आहेत, त्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात.” योजनांची अंमलबजावणी करतांना उद्भवणारे जमीन विषयक प्रश्न, पाणीपुरवठा योजना राबविताना येणाऱ्या भूसंपादन व परवानगीबाबत अडचणी तत्काळ समन्वयाने सोडवून कार्यवाही करावी. याबाबत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जल जीवन मोहिमेची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title : जल जीवन मिशन के तहत जल आपूर्ति योजनाएं समय पर पूरी करें

Web Summary : कलेक्टर जितेंद्र डुडी ने जल जीवन मिशन के तहत जल आपूर्ति योजनाओं को तुरंत पूरा करने का निर्देश दिया। उन्होंने प्रत्येक घर को नल का पानी सुनिश्चित करने, लंबित कनेक्शनों को प्राथमिकता देने और परियोजना की समय सीमा को कुशलतापूर्वक पूरा करने के लिए भूमि अधिग्रहण के मुद्दों को हल करने पर जोर दिया।

Web Title : Complete Water Supply Schemes Under Jal Jeevan Mission on Time

Web Summary : Collector Jitendra Dudi directed officials to complete Jal Jeevan Mission water supply schemes promptly. He emphasized providing tap water to every household, prioritizing pending connections, and resolving land acquisition issues to meet project deadlines efficiently.