Video : पुण्यात कमर्शियल गॅस बंद; गर्ल्स हॉस्टेलच्या मेसमध्ये चक्क चुलीवर स्वयंपाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:39 IST2026-03-11T18:34:43+5:302026-03-11T18:39:25+5:30

या मेसमध्ये दररोज सुमारे दोनशेहून अधिक मुलींसाठी जेवण बनवले जाते.

pune news commercial gas shut down in Pune; Cooking on stove in girls' hostel mess | Video : पुण्यात कमर्शियल गॅस बंद; गर्ल्स हॉस्टेलच्या मेसमध्ये चक्क चुलीवर स्वयंपाक

Video : पुण्यात कमर्शियल गॅस बंद; गर्ल्स हॉस्टेलच्या मेसमध्ये चक्क चुलीवर स्वयंपाक

पुणे : शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच देशभरातून अनेक तरुण-तरुणी पुणे शहरात येतात. त्यांच्यासाठी शहरभरात अनेक मेस आणि हॉस्टेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे काही मेस चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शहरातील जंगली महाराज रोड परिसरातील एका गर्ल्स हॉस्टेलमधील मेसमध्ये कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याने चक्क चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. या मेसमध्ये दररोज सुमारे दोनशेहून अधिक मुलींसाठी जेवण बनवले जाते. गॅस नसल्याने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणे अवघड ठरत असून, मेस चालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चुलीचा आधार घेतला आहे.



मेस व्यवस्थापनाच्या मते, अचानक कमर्शियल गॅसचा पुरवठा थांबल्याने स्वयंपाक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तरीही मुलींच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. मात्र या पद्धतीने स्वयंपाक करताना वेळ जास्त लागत असून, धूर आणि इतर अडचणींचाही सामना करावा लागत आहे.  दरम्यान, विद्यार्थिनींना वेळेत आणि नियमित जेवण मिळावे यासाठी मेस चालक प्रयत्न करत असले तरी कमर्शियल गॅसचा पुरवठा लवकर सुरू व्हावा, अशी मागणी मेस चालकांकडून करण्यात येत आहे.

Web Title : पुणे: वाणिज्यिक गैस की कमी से छात्रावास मेस में लकड़ी के चूल्हे का उपयोग

Web Summary : पुणे में वाणिज्यिक गैस की कमी के कारण एक गर्ल्स हॉस्टल मेस को पारंपरिक चूल्हे पर खाना बनाना पड़ रहा है। प्रतिदिन 200 से अधिक छात्रों को भोजन परोसने वाली मेस को समय और धुएं की चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। मालिकों ने समय पर भोजन सुनिश्चित करने के लिए गैस की आपूर्ति जल्द शुरू करने का आग्रह किया।

Web Title : Pune: Commercial Gas Shortage Forces Hostel Mess to Use Wood-Fired Stoves

Web Summary : A commercial gas shortage in Pune forces a girls' hostel mess to cook on traditional stoves. Serving over 200 students daily, the mess faces challenges with time and smoke. Owners urge a quick resumption of gas supply to ensure timely meals.