‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देतो; डाॅक्टरची केली २४ लाखांची फसवणूक; माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:32 IST2025-11-06T15:32:30+5:302025-11-06T15:32:49+5:30
आरोपींनी ‘ॲमिनेटी स्पेस’ मिळवून देणे, तसेच महानगरपालिकेची परवानगी मिळवू देतो, असे सांगितले होते. डाॅक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देतो; डाॅक्टरची केली २४ लाखांची फसवणूक; माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा
पुणे : सार्वजानिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड (ॲमिनेटी स्पेस) मिळवून देण्याच्या आमिषाने हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील एका डॉक्टरांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख (रा. मंगळवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डाॅ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (३९, रा. महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डाॅक्टरांचे महंमदवाडी परिसरात रुग्णालय आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत आरोपींनी ‘ॲमिनेटी स्पेस’ मिळवून देणे, तसेच महानगरपालिकेची परवानगी मिळवू देतो, असे सांगितले होते. डाॅक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी डॉक्टरांनी आपल्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. मात्र, ठरलेली जागा न मिळवून न देता फसवणूक केली, असे डाॅ. सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.