कारची दुचाकीला धडक; मुलाचा मृत्यू, आई गंभीर; कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 19:35 IST2025-07-20T19:34:55+5:302025-07-20T19:35:33+5:30

अपघातात मयूर याची आई गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune news Car hits two-wheeler; Child dies, mother critical; Case registered against car driver | कारची दुचाकीला धडक; मुलाचा मृत्यू, आई गंभीर; कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

कारची दुचाकीला धडक; मुलाचा मृत्यू, आई गंभीर; कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : भरधाव कारने दुचाकीस्वार माय-लेकाला धडक दिल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. शुक्रवारी (दि. १८) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

मयूर रमेश पिंपळे (२८, रा. आनंद पार्क, भैरवनगर, धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात मयूर याची आई गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मयूर आणि त्याची आई हे आनंद पार्क परिसरातून शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार मयूर याला गंभीर दुखापत झाली, तसेच सहप्रवासी आई जखमी झाली. उपचारादरम्यान मयूरचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करीत आहेत.

Web Title: pune news Car hits two-wheeler; Child dies, mother critical; Case registered against car driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.