शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बस तिकीट दरवाढीमुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नामध्ये तब्बल ५० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:54 IST

- दैनिक पासची किंमत ४० वरून ७० रुपये, तर मासिक पास ९०० वरून १,५०० रुपये, दरवाढीमुळे लांबपल्ल्याच्या प्रवास खर्चात लक्षणीय वाढ; अधिक पैसे मोजावे लागत असल्याने प्रवासी हैराण   

पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) दहा वर्षानंतर १ जून २०२५ पासून बस भाड्यात वाढ केली. यामुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नात ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, नव्या दरानुसार, किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये झाले आहे, दैनिक पास ४० वरून ७० रुपये, तर मासिक पास ९०० वरून १,५०० रुपये झाला आहे. या वाढीमुळे लांबपल्ल्याच्या प्रवासाचा खर्च लक्षणीय वाढला आहे. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक ताण आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, भोसरी व पिंपरी येथील पीएमपी आगारातून ९६ मार्गावर ३९१ बस धावत असून, त्यांच्या दररोज ४,३९२ फेऱ्या होतात. या आगारांतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बस जातात. या तिन्ही आगारांच्या दैनंदिन उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे.

'पीएमपी'ने वाढत्या इंधन खर्च, देखभाल खर्च आणि नवीन सीएनजी बसेस तसेच डिजिटल तिकीट प्रणालीसाठी ही वाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तरीही, प्रवाशांचा असंतोष आणि खासगी वाहनांच्या वापरात वाढ होण्याची शक्यता यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.तिकीट दरवाढ केल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापेक्षा खासगी वाहनाने प्रवास करणे स्वस्त वाटत असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.

प्रवासाच्या खर्चामध्ये अचानक दुप्पटीने वाढकेवळ तिकीटाचे दर वाढवले नसून पीएमपीने पासच्या दरातही वाढ केली आहे. प्रवासाचा खर्च एकदम दुप्पटीने वाढल्याने नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडणार असून आर्थिक ताण येणार आहे.

भाडेवाढीमुळे तीव्र नाराजीभाडेवाढीच्या निर्णयामुळे सामान्य प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एका प्रवाशाने सांगितले, भाडे वाढले; पण बसेसची अवस्था आणि वेळापत्रक सुधारले नाही. ही वाढ सामान्यांना झटका देणारी ठरवली आहे. मासिक खर्च आता दुप्पट होणार, असे एका प्रवाशाने सांगितले. स्वच्छता, वेळेवर सेवा आणि बसेसची दुरुस्ती यावर भर देण्याची मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे.

पीएमपीएमएलकडून दहा वर्षांनंतर १ जून २०२५ पासून बस भाड्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे 'पीएमपी'च्या एकूण उत्पन्नात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpassengerप्रवासी