ऑफिसची मिटिंग सुरु असतानाच बिस्कीट खाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 'बॉस'ने केला 'असा' मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:44 IST2025-05-27T13:44:16+5:302025-05-27T13:44:55+5:30
मॅनेजरसोबत घडलेला असाच एक किस्सा पुण्यातील धिमाही जैन यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. त्याचं झालं असं की..

ऑफिसची मिटिंग सुरु असतानाच बिस्कीट खाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 'बॉस'ने केला 'असा' मेसेज
पुणे - ऑफिस म्हंटलं की काम आलंच. मात्र कामासोबतच ऑफिसमध्ये अनेकदा मजेशीर किस्से देखील घडत असतात. असे भन्नाट किस्से सोशल मीडियाच्या चावडीवर शेअर केले जातात. कामाच्या व्यापातून वेळ काढत अशा किस्स्यांवर मग गप्पांचे फड रंगतात.
मॅनेजरसोबत घडलेला असाच एक किस्सा पुण्यातील धिमाही जैन यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. त्याचं झालं असं की, धिमाही काम करत असलेल्या कंपनीची एक ऑनलाईन मिटिंग सुरु होती. मिटिंग ऑनलाईन असल्याने धिमाही यांनी, मिटिंग सुरु असताना बिस्किटाचा आस्वाद घ्यावा असा विचार केला.
today I couldn’t control myself and started snacking on my fav cookies during a work call, thinking mic mei kya hi awaz aaegi..
— Dhimahi Jain (@Dhimahi11) May 26, 2025
and this is how my manager reacted pic.twitter.com/yQoQ4SEAUP
बिस्कीट खात असतानाच धिमाही यांना, त्यांच्या मॅनेजरचा एक मेसेज आला. हा मेसेज वाचून त्यांनाही हसू आवरलं नाही. मॅनेजर साहेबांनी लिहलेलं, धिमाही तुझा स्पीकर चालू असून तू बिस्कीट खाताना अख्ख्या मीटिंगमध्ये कुरुम-कुरुम आवाज येतोय. तुझा स्पीकर बंद कर. या मेसेजचा स्क्रिनशॉट धिमाही यांनी एक्स पोस्टद्वारे शेअर केला आहे.
धिमाही यांच्या पोस्टवर कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गप्पांचा फड रंगवला आहे. असे हलके फुलके क्षण कामाचा ताणतणाव कमी करून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देतात, अशा प्रतिक्रिया काहींनी नोंदवल्या आहेत.