इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे; वाघ्या श्वानासाठी अभ्यासकांची समिती नेमावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 09:59 IST2025-03-29T09:59:21+5:302025-03-29T09:59:59+5:30

महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे.

pune news Bhushan Singh Raje Holkar A committee of scholars should be appointed for vaghya | इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे; वाघ्या श्वानासाठी अभ्यासकांची समिती नेमावी

इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे; वाघ्या श्वानासाठी अभ्यासकांची समिती नेमावी

पुणे : रायगडावरील वाघ्या श्वानाचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे. इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत. यासाठी शासनाने मध्यस्थी करावी.

महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे समाज  एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय. वाघ्या श्वानाच्या अस्तित्वावर भाष्य करण्यास नकार देतानाच राज्य सरकारने त्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी, अशी मागणी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली.इतिहास अभ्यासकांच्या समितीमध्ये संजय सोनवणी आणि इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या अभ्यासकांना घ्यावे. जेणेकरून ऐतिहासिक सत्य समोर येईल, असे सांगून भूषणसिंह राजे होळकर म्हणाले,

होळकरांनी रायगडावरील शिव समाधीसाठी मोठा निधी दिला होता. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी योगदान दिले, त्याच्या स्पष्ट नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे? होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यामुळे होळकर इंग्रजांना घाबरत होते, असे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहास किती खोल आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

Web Title: pune news Bhushan Singh Raje Holkar A committee of scholars should be appointed for vaghya