शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीच्या फुलांनी बहरली भीमा; हातवळण येथे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:07 IST

या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांसह बाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

वरवंड : दौंड तालुक्यातील हातवळण येथील भीमा नदी सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकली असली तरी त्या जलपर्णीवर उमललेल्या आकर्षक जांभळट फुलांमुळे परिसरात नयनरम्य दृश्य निर्माण झाले आहे. या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांसह बाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

भीमा नदीच्या पाण्यावर दाट प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीमध्ये उमललेली जांभळट फुले नदीकाठाला वेगळेच सौंदर्य प्रदान करत आहेत. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत हे दृश्य अधिक खुलून दिसत असल्याने अनेक जण खास त्या वेळेत येथे येत आहेत. कुटुंबासोबत फिरणे, मित्रमंडळींसोबत वेळ घालवणे तसेच निसर्ग छायाचित्रणासाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

युवक-युवतींमध्ये या ठिकाणाबद्दल विशेष उत्सुकता दिसून येत असून सेल्फी काढणे, रील्स आणि व्हिडिओ तयार करून ते फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे हातवळण येथील भीमा नदी परिसराची ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचत असल्याचे दिसून येते. मात्र, जलपर्णीचे वाढते प्रमाण नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरत असून जलप्रदूषण आणि जैवविविधतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासेमारी व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता परिसरात कोणतीही विशेष सुरक्षा व्यवस्था नसल्याने काही प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने जलपर्णी हटविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच पर्यटकांसाठी आवश्यक सुरक्षा व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bheema River Blooms: Water Hyacinth Flowers Attract Tourists to Hatwalan.

Web Summary : Water hyacinth flowers bloom in the Bheema River at Hatwalan, attracting tourists. Locals fear pollution and demand safety measures.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे