मार्च महिन्यामध्ये तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार;सुट्यांमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:42 IST2026-03-03T09:41:52+5:302026-03-03T09:42:31+5:30

यामध्ये होळी (धूलिवंदन), गुढीपाडवा, रमजान यांसारख्या मोठ्या सण उत्सवांचा समावेश आहे.

pune news banks will remain closed for 12 days in March; citizens may face inconvenience due to holidays | मार्च महिन्यामध्ये तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार;सुट्यांमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता

मार्च महिन्यामध्ये तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार;सुट्यांमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता

पुणे : फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरू झाला असून, या महिन्यात बँकांच्या कामकाजावर सुट्ट्यांचा मोठा परिणाम होणार आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग कामासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, याच महिन्यात अनेक महत्त्वाचे सण येत आहेत.

यामध्ये होळी (धूलिवंदन), गुढीपाडवा, रमजान यांसारख्या मोठ्या सण उत्सवांचा समावेश आहे. साप्ताहिक सुट्टयांमुळे एकूण १२ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. सलग सुट्टया आल्यामुळे आर्थिक व्यवहार रखडण्याची शक्यता असून, चेक क्लिअरन्स, नवीन खाते उघडणे आणि इतर बँक व्यवहारांसाठी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


या महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी
१ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३ मार्च होळी (धूलिवंदन)
८ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१४ मार्च दुसरा शनिवार
१५ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१९ मार्च गुढीपाडवा
२१ मार्च रमजान ईद
२२ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२६ मार्च श्रीराम नवमी
२८ मार्च चौथा शनिवार
२९ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३१ मार्च महावीर जयंती


सामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम?

मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे कर भरणा, गुंतवणूक आणि बँकिंग कामांसाठी या महिन्यात मोठी गर्दी असते. अशातच १२ दिवस बँका बंद राहणार असल्याने व्यापाऱ्यांची अडचण होणार आहे. रोकड जमा करणे आणि धनादेश वटवणे यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
चेक क्लिअरन्सः सलग सुट्टयांमुळे चेक
क्लिअर होण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक चक्र विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
सरकारी देयके : मार्चअखेर असल्याने
प्राप्तिकर किंवा इतर सरकारी देयके भरण्यासाठी शेवटच्या तारखेची घाई होऊ शकते.
नवीन खाती व कर्ज प्रक्रियाः नवीन खाते उघडणे किंवा कर्जाचे प्रस्ताव मंजूर होण्यास अधिक वेळ लागू शकतो.
एटीएम सेवाः सलग सुट्टयांमुळे अनेक
भागांत एटीएममधील रोकड संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर्ज प्रक्रिया: गृहकर्ज किंवा इतर कर्जाचे
प्रस्ताव सुट्ट्यांमुळे लांबणीवर पडू शकतात. बँकांचे प्रत्यक्ष कामकाज बंद असले तरी नेट बैंकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआय सेवा, २४ तास सुरू राहतील.

Web Title : मार्च में 12 दिन बैंक बंद; नागरिकों को असुविधा होने की संभावना।

Web Summary : मार्च में त्योहारों और सप्ताहांतों के कारण 12 दिन बैंक बंद रहेंगे, जिससे वित्तीय लेनदेन बाधित हो सकते हैं। चेक क्लीयरेंस और नए खातों में देरी हो सकती है। एटीएम में नकदी खत्म हो सकती है। ऑनलाइन बैंकिंग उपलब्ध रहेगी।

Web Title : Banks closed for 12 days in March; public inconvenience likely.

Web Summary : March sees 12 bank holidays due to festivals and weekends, potentially disrupting financial transactions. Check clearances and new accounts may face delays. ATMs could run out of cash. Online banking remains available.