शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी कायमची हरपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:00 IST

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. परंतु, गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.अधिकच्या माहितीनुसार,  २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी जास्त तापल्याचे पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सांडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली होती. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल काही दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी पुढाकार घेत तिला मदत केली होती. मात्र, सर्वांच्या प्रयत्नांनंतरही तिचे आयुष्य वाचवता आले नाही. अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न होते. त्या दिशेने ती प्रयत्नशील होती. परंतु दुर्दैवाने तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांत शोककळा पसरली आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी