ऑलनाइन कामकाज आणि मूल्यमापन निश्चित होणार;महसूल, नोंदणी व भूमी अभिलेखसाठी समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:00 IST2025-06-11T08:57:34+5:302025-06-11T09:00:40+5:30

या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

pune news all in one operations and valuation to be finalized; Committee established for revenue, registration and land records | ऑलनाइन कामकाज आणि मूल्यमापन निश्चित होणार;महसूल, नोंदणी व भूमी अभिलेखसाठी समितीची स्थापना

ऑलनाइन कामकाज आणि मूल्यमापन निश्चित होणार;महसूल, नोंदणी व भूमी अभिलेखसाठी समितीची स्थापना

पुणे : राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘माझी जमीन माझा हक्क’ या मोहिमेसाठी महसूल विभागाने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागातील कामकाज नीटपणे व्हावे यासाठी ही समिती कार्यपद्धती निश्चित करणार आहे. तसेच तिन्ही विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या कामांची ऑनलाइन प्रक्रिया तसेच मूल्यमापन करण्याची पद्धतीही निश्चित करणार आहे.

महसूल आणि भूमी अभिलेख विभागामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची जमीनविषयक कामे करण्यासाठी विविध कायदे नियम, शासन निर्णय, परिपत्रके, आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार कामकाज करण्यात येत असते. मात्र, महसूल विभागाचे कामकाज सामान्य नागरिकांना समजावे, त्यातील किचकट नियम लागलीच समजावीत, यासाठी राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असते. मात्र, हे अभियान अल्प काळासाठी असते. ही बाब लक्षात घेऊन महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागातील कामकाज नीटपणे व्हावे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
समिती करणार हे कामकाज

-महसूल, मुद्रांक व नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाशी निगडित निवडक कामांचा शोध घेऊन ती कामे निश्चित करणे

-महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतुदी, तसेच इतर कायद्यातील तरतुदी, शासन निर्णय, नियम, परिपत्रके यांचा अभ्यास करणे

-विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करणे

-निवडण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन करणे तसेच त्याची मानके निश्चित करणे

अशी आहे समिती

डॉ. सुहास दिवसे (अध्यक्ष), सर्व महसूल उपायुक्त (सदस्य), मनीषा जायभाये (सदस्य), सत्यनारायण बजाज (सदस्य), संजय बनकर (सदस्य), दौलत देसाई (अशासकीय सदस्य), अजय गुल्हाणे (अशासकीय सदस्य), जगदीश संगीतराव (अशासकीय सदस्य), पी. आर. कुलकर्णी (अशासकीय सदस्य), भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक (सदस्य सचिव)

Web Title: pune news all in one operations and valuation to be finalized; Committee established for revenue, registration and land records