पुण्याच्या विकासाला ब्रेक ? अजित पवार यांची उणीव जाणवली, पुण्याला अर्थसंकल्पात कमी निधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:18 IST2026-03-07T13:16:31+5:302026-03-07T13:18:03+5:30

- पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याला निधी देण्यात हात आखडता घेण्यात आला आहे.

pune news Ajit Pawar absence felt, Pune gets less funds in the budget | पुण्याच्या विकासाला ब्रेक ? अजित पवार यांची उणीव जाणवली, पुण्याला अर्थसंकल्पात कमी निधी 

पुण्याच्या विकासाला ब्रेक ? अजित पवार यांची उणीव जाणवली, पुण्याला अर्थसंकल्पात कमी निधी 

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला; पण या अर्थसंकल्पात पुण्याला गेल्या काही वर्षांच्या तलुनेत कमी निधी मिळाला आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याला निधी देण्यात हात आखडता घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव जाणवत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यामुळे अजित पवार यांच्याकडील अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पुण्याच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड, रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रोच्या उपमार्गांचा समावेश आहे. येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाचा डीपीआर तयार केला जाणार आहे; पण त्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतुदीचा उल्लेख नाही.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सलग ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिचंवड या शहरांना मुबलक निधी मिळत होता. पुणे जिल्ह्याला निधी देण्यात अजित पवार यांचे झुकते माप होते; पण २०२६-२०२७ च्या राज्याच्या अंदाजपत्रकात पुणे शहर आणि जिल्ह्याला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत निधी कमी मिळाला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव जाणवत आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्पात पुणे शहर, पिपंरी चिचंवड आणि पुणे जिल्ह्याला मुबलक निधी देत होते; पण २०२६-२०२७ च्या राज्याच्या अंदाजपत्रकात पुण्याला निधी कमी मिळालेला आहे. त्यामुळे अजित पवार यांची उणीव जाणवू लागली आहे. -  सुभाष जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)

Web Title : पुणे विकास धीमा? अजित पवार की कमी महसूस हुई; कम धन आवंटित

Web Summary : बजट में पुणे को कम धन मिला, जिससे अजित पवार की कमी उजागर हुई। मेट्रो परियोजनाएं शामिल हैं, लेकिन प्रमुख बजटीय प्रावधान गायब हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पवार के कार्यकाल की तुलना में कम आवंटन पर शोक व्यक्त किया।

Web Title : Pune Development Slowed? Ajit Pawar's Absence Felt; Less Funds Allocated

Web Summary : Pune receives less funding in the budget, highlighting Ajit Pawar's absence. Metro projects are included, but key budgetary provisions are missing. Nationalist Congress Party laments the reduced allocation compared to Pawar's tenure.