दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:23 IST2025-07-09T15:22:43+5:302025-07-09T15:23:56+5:30

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. दापोडीतील राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीबाबत सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडून विशेष लेखापरीक्षण करण्यात आले.

pune news action will be taken against the scammers at Dapodi ST workshop; Information from Transport Minister Pratap Sarnaik | दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पिंपरी :पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीत झालेल्या गैव्यवहारप्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य संदीप क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सरनाईक म्हणाले की, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. दापोडीतील राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीबाबत सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडून विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. याप्रकरणी अनियमितता झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांची चौकशी केली असता, ते अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्या मासिक पगारातून दहा टक्के रक्कम घेण्यात आली आहे.

Web Title: pune news action will be taken against the scammers at Dapodi ST workshop; Information from Transport Minister Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.