पुणे : शहरातील विविध भागात अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटविण्याची धडक मोहीम महापालिकेने आज (बुधवार) पासून सुरू केली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागासह विविध विभागांच्या संयुक्त पथकाने सातारा रस्त्यावरील अनधिकृत केबलवर कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन ट्रक केबल काढण्यात आल्या. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी अनधिकृतपणे खांबांवर केबल्स टाकून शहराचे विद्रूपीकरण केले आहे.
शहरातील अनेक रस्ते, तसेच चौक आणि इमारतींवर गुंतागुंतीचे अनधिकृत केबलचे जाळे निर्माण झाले असून, त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘केबलचे जाळे बेततेय पुणेकरांच्या जिवावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करत या प्रश्नाला वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अनधिकृत केबल्सवर धडक कारवाईची मोहीम हाती घेत दोन ट्रक केबल काढल्या आहेत. दरम्यान, काही कंपन्या गाईडरोपचा वापर करतात. त्यात ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने प्रवाही विजेचा धक्का बसून मनुष्यहानी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. यामुळे याबाबत
महानगरपालिकेचा विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी पुष्प मंगल कार्यालय, उत्सव इमारत परिसर, राजर्षी शाहू महाराज सोसायटी, पुण्याई नगर, धनकवडी या परिसरातील अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्यात आली. यावेळी विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, कार्यकारी अभियंता योगेश माळी, उप अभियंता जयदीप अडसूळ, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी पोटफोडे, सहायक विभागीय अधिकारी विजय भिलारे, स्टेशन ऑफिसर प्रभाकर उमरकर, समीर शेख, प्रदीप खेडेकर आदी उपस्थित होते. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात पालिका क्षेत्रात ३ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य करण्यात आलेले आहे. विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी पालिकेकडून रितसर परवानगी घेऊन भूमिगत केबलच टाकाव्यात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर पुढील काळात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.दोन ट्रक अनधिकृत केबल
गेल्या वर्षीपासून महापालिकेच्या विद्युत विभागाकडून काही प्रमाणात अनधिकृत केबलवर कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर, पुन्हा एकदा ही कारवाई थंडावली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर शहरातील अनधिकृत केबलचे जाळे काढून त्यावर नियंत्रण आणण्याचे तसेच त्याद्वारे महसूल गोळा करण्यासही प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्युत व अतिक्रमण विभागाकडील वायरमन, बिगारी, तीन हायड्रॉलिक क्रेन यांच्या मदतीने केलेल्या या कारवाईमध्ये दोन ट्रक अनधिकृत केबल काढण्यात आल्या.
कारवाईनंतर नेटवर्क गायब
महापालिकेने अनधिकृत केबलवर कारवाई सुरू केली. त्यामध्ये तासाभरातच आदिनाथ सोसायटीसमोरील केबलचे जाळे तोडले. त्यानंतर काही क्षणातच संबंधित परिसरातील नामांकित कंपन्यांचे मोबाइल नेटवर्क गायब झाले. नामांकित मोबाइल कंपन्या, इंटरनेट, दूरचित्रवाणी अशा विविध प्रकारच्या केबलवर ही कारवाई करण्यात आली. महापालिका व पोलिसांच्या सीसीटीव्हीच्या केबल वगळता उर्वरित केबल काढून टाकण्यात आल्या.
शहरातील अनधिकृत केबलवर कारवाई सुरू आहे. ओव्हरहेड केबलसाठी धाेरण तयार करावे लागणार आहे. आगामी बैठकीत याबाबतचे धोरण मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. - नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.
विशेषतः गायरोप केबल्स आणि विविध टेलिफोन कंपन्यांच्या केबल्स अनियमित पद्धतीने टाकल्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित झाले असून, जीवित हानी होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही कारवाई करत असून, ती दर आठवड्याला विविध भागात राबविली जाईल. - श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती पुणे महापालिका
Web Summary : Pune Municipal Corporation initiated a drive against unauthorized overhead cables, seizing two truckloads. Many companies ignored underground cable rules, creating hazardous networks. Action followed reports highlighting risks to citizens. Regular drives planned to address the issue.
Web Summary : पुणे नगर निगम ने अनधिकृत ओवरहेड केबलों के खिलाफ अभियान शुरू किया, दो ट्रक जब्त किए। भूमिगत केबल नियमों की अनदेखी कर कई कंपनियों ने खतरनाक नेटवर्क बनाए। नागरिकों के लिए खतरे की खबरों के बाद कार्रवाई की गई। नियमित अभियान की योजना।