दुचाकी घसरून सहप्रवासी युवकाचा मृत्यू ; नवीन कात्रज बोगद्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:39 IST2025-12-16T17:37:16+5:302025-12-16T17:39:55+5:30
- दुचाकीस्वार कृष्णा आणि त्याचा मित्र चेतन हे २७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाले होते.

दुचाकी घसरून सहप्रवासी युवकाचा मृत्यू ; नवीन कात्रज बोगद्यातील घटना
पुणे : भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चेतन मधुकर मोरे (१७, रा. गणेश चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे तर कृष्णा तानाजी मादगुडे (१८, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी, मूळ रा. तांबाड, ता. भोर, जि. पुणे) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत चेतन मोरेची आई मंगल (३६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कृष्णा आणि त्याचा मित्र चेतन हे २७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. नवीन कात्रज बोगद्यात दुचाकी घसरली. अपघातात सहप्रवासी चेतन आणि दुचाकीस्वार कृष्णा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान चेतन याचा मृत्यू झाला. याबाबत त्याची आई मंगल यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.