येळकोट -येळकोट येळकोट जयमल्हार..! माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी, शिखर काठ्यांची उद्या देवभेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 19:05 IST2026-02-01T19:02:00+5:302026-02-01T19:05:01+5:30

माघ पौर्णिमा उत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व कोकणी (कोळी) बांधवांचा उत्सव समजला जातो.

pune news a large crowd of devotees gathers at Jejuri Fort on the occasion of Magh Pournima, Shikhar Katha will be worshipped by God tomorrow | येळकोट -येळकोट येळकोट जयमल्हार..! माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी, शिखर काठ्यांची उद्या देवभेट 

येळकोट -येळकोट येळकोट जयमल्हार..! माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी, शिखर काठ्यांची उद्या देवभेट 

जेजुरी : सदानंदाचा येळकोट -येळकोट येळकोट जयमल्हार असा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत राज्याच्या विविध प्रांतातून आलेल्या माघ पौर्णिमा शिखर काठी यात्रेनिमित्त भाविक भक्तांनी खंडेरायाचे देवदर्शन घेत कुलधर्म कुलाचार केला. माघ पौर्णिमा उत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व कोकणी (कोळी) बांधवांचा उत्सव समजला जातो.

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः आंबेगाव जुन्नर , संगमनेर, नाशिक, सिन्नर संभाजीनगर, अकोले येथील शेतकरी बांधव प्रासादिक शिखर काठ्यांसह जेजुरीत दाखल होतात. त्यांचा निवास कडेपठार डोंगर पायथ्यानजीक असतो तर रायगड, अलिबाग, वेसावकर येथील कोळी बांधव आपल्या परिवारासह देवघरातील टाक घेऊन पालखीसह खंडोबा भेटीसाठी जेजुरीत दाखल होतो यांचा निवास चिंचेची बाग परिसरात असतो.

सालाबादप्रमाणे यंदा कोकणी (कोळी) बांधव आलेले असले तरी त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. सोमवारी (दि. २) ढोल-ताशे, हलगीच्या तालात वाजत गाजत गडावर दाखल होत मुख्य मंदिराच्या शिखराला टेकवण्याच्या धार्मिक विधी होणार आहे. यामध्ये संगमनेरकर होलम राजाची शिखर काठी, सुपे (बारामती) येथील खैरे पाटील आणि स्थानिक होळकर शिखर काठी या तीन मानाच्या शिखर काठ्या समजल्या जातात. मानाच्या शिखर काठ्या जेजुरीत दाखल झालेल्या आहेत. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून मुख्य मंदिर गाभारा फुलांनी सजविण्यात आला आहे. शिखर काठी उत्सवानिमित्त योग्य पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मानाच्या शिखर काठ्या जेजुरी गडावर एकत्र जाऊन टेकवण्याची पूर्वीची प्रथा होती. यामुळे नेहमीच वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने प्रशासनाने ही प्रथा बंद करून शिखर काठ्यांच्या मानकऱ्यांना स्वतंत्र वेळ देऊन जेजुरी गडावर जाऊन आपला मान स्वीकारण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. आज सायंकाळी ७ वाजता जेजुरी पोलिस ठाण्यात जेजुरी पोलिस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे, मार्तंड देव संस्थांनचे विश्वस्त आणि होलम, खैरे आणि होळकर काठ्यांच्या मानकऱ्यांची बैठक झाली.

बैठकीत उद्या दि. २ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत सुपेकर-खैरे काठीसह असणाऱ्या सर्व प्रासादिक शिखर काठ्यांनी गडावर जाऊन दर्शन घ्यावे, स्थानिक होळकर शिखर काठी ही सुपेकर-खैरे काठीसोबत गडावर जाणार आहे तर १२ ते २ यावेळेत संगमनेरकर होलम काठीने आपल्या प्रासादिक काठ्यांसह गडावर जाऊन देवदर्शन घ्यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले. शिखर काठ्यांनी कमी वेळेत आणि शांततेत देवदर्शन घ्यावे असे आवाहन जेजुरी पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

भंडारा खोबरे विक्रेता आणि भाविकांमध्ये हाणामारी -

जेजुरीतील नंदी चौकात भंडार खोबरे विक्रेत्याचे आणि भाविक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यातून भाविकांनी भंडारा खोबरे विक्रेत्याला चांगलीच मारहाण केली. दुकानाची मोडतोड करण्यात आली. वाद नेमका कशावरून झाला हे समजले नाही. याबाबत मात्र कोणीही जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. भंडार खोबरे विक्रेते आणि भाविक यांच्यात नेहमीच देवाण-घेवाण करताना शाब्दिक चकमकी होतं असतात. मात्र मारहाणीपर्यंत असे विषय होत नाहीत. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने या घटनेची शहरात मोठीं चर्चा आहे.

Web Title : माघ पूर्णिमा पर जेजुरी में भारी भीड़; कल शिखर काठी की देवभेट।

Web Summary : जेजुरी में माघ पूर्णिमा पर शिखर काठी यात्रा के लिए भक्तों की भीड़ उमड़ी। किसान और कोली श्रद्धालु पालकी लेकर पहुंचे। कल विवाद समाधान बैठकों के बाद पवित्र खंभे ('शिखर काठी') देवता को अर्पित किए जाएंगे। विक्रेताओं और भक्तों के बीच मामूली झड़प हुई।

Web Title : Jejuri witnesses huge crowd for Magh Purnima; Devbhet of Shikhar Kathi tomorrow.

Web Summary : Jejuri saw devotees for Magh Purnima, with the Shikhar Kathi Yatra. Farmers and Koli devotees arrived with palanquins. Tomorrow, the sacred poles ('Shikhar Kathi') will be offered to the deity after dispute resolution meetings. A minor clash occurred between vendors and devotees.