सिंहगडच्या बर्ड व्हॅलीत भरतोय विविध फुलपाखरांचा मेळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:00 IST2026-02-17T14:59:44+5:302026-02-17T15:00:33+5:30

किल्ले सिंहगडच्या पायथ्यालगतच्या बर्ड व्हॅलीत नजरेत भरत आहे.

pune news a fair of various butterflies is being held in the Bird Valley of Sinhagad | सिंहगडच्या बर्ड व्हॅलीत भरतोय विविध फुलपाखरांचा मेळा  

सिंहगडच्या बर्ड व्हॅलीत भरतोय विविध फुलपाखरांचा मेळा  

 - जयवंत गंधाले 

हडपसर : विविध रंगाची उधळण, डौलदार हालचाल, सततची लगबग, असे प्रसन्न वातावरण सध्या किल्ले सिंहगडच्या पायथ्यालगतच्या बर्ड व्हॅलीत नजरेत भरत आहे. येथे विविध रंगीबेरंगी फुलपाखरे स्वच्छंद विहरत असतात. या सुरेख पाहुण्यांच्या मुद्रा टिपण्यासाठी पर्यावरणप्रेमी गर्दी करीत आहेत. विविध जातींची फुलपाखरे येथील पाणथळ परिसरात विहार करीत असतात. अन्नाची कमतरता, अतिपाऊस व कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी फुलपाखरे स्थलांतर करतात. यामध्ये इमिग्रंट, ब्ल्यू टायगर, कॉमन क्रो व क्रिम्सन रोज आदी फुलपाखरे नियमित स्थलांतर करतात. ओढ्यात ओलावा असेपर्यंत येथे त्यांचा अधिवास असतो, अशी माहिती पर्यावरणप्रेमी पवन दामूर आणि मंदार निम्बर्गी यांनी दिली.

ओलसर जमिनीचा शोध सुरू

उन्हाळ्याची चाहूल लागताच यातील काही फुलपाखरे पुन्हा ओल्या जमिनीच्या शोध कामाला लागतात. बनेश्वर, ताम्हिणी घाट, मढी घाट व भीमाशंकर येथे पाणवठ्याशेजारील ओल्या वाळू, माती किंवा खडकाळ भागात ही फुलपाखरे अन्न मिळवतात. तरी यंदा वरुणराजा पाहिजे असा बरसला आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता लवकर भासली नाही. परंतु, या खडकाळ भागातली डोंगर उतारावरील जमिनीतील पाणी लवकर संपते. पाण्याची कमतरता भासली की, झुडपे व गवताळ भाग लवकरच पिवळसर पडायला सुरुवात होते.

बर्ड व्हॅलीत दिसणारी फुलपाखरे

स्किपर फुलपाखरे : ऑरेंज टेल ऑल, ब्राऊन ऑल, मलबार स्पॉटेड फ्लॅट,वॉटर स्नो फ्लॅट, राइस स्विफ्ट, विंध्यन बॉब, कॉमन रेड आय, ग्रास डेमन.

स्टॅलोटेल फुलपाखरे : स्पॉट स्वोर्डटेल, टेल्ड जे, कॉमन रोझ कॉमन मोरमॉन, ब्ल्यू मोरमॉन, लाइम बटरफ्लाय.

व्हाइट अँड यलो फुलपाखरे : स्मॉल ग्रास यलो, कॉमन ग्रास यलो, कॉमन इमिग्रंट, कॉमन गल, कॉमन जेझेबेल, पायोनीअर, व्हाइट ऑरेंज टीप, येलो ऑरेंज टीप, कॉमन वांडरर, साइक.

ब्ल्यू फुलपाखरे : एपफ्लाय, इंडियन सनबीम, टाइनी ग्रास ब्ल्यू स्लेट फ्लॅश, कॉमन सिल्व्हरलाइन, शॉट सिल्वरलाइन, कॉमन सेरुलिअन, सिल्व्हरस्ट्रीक ब्ल्यू, ग्रास ब्ल्यू, ग्राम ब्ल्यू, रेड फ्लॅश, कॉमन पियारो, रेड पियरो, झेब्रा ब्ल्यू, पी ब्ल्यू, अबनॉर्मल सिलव्हरलाइन, मलायन, हेज ब्ल्यू व प्लम ज्यूडी.

ब्रश-फुटेड फुलपाखरे : ग्लॉसी टायगर, ब्ल्यू टायगर, प्लेन टायगर, कॉमन क्रो, ब्राऊन किंग क्रो, कॉमन नबाब, कॉमन इव्हिनिंग ब्राऊन, ब्लॅक राजा, पामफ्लाय, कॉमन थ्री रिंग, फोर रिंग, फाइव्ह रिंग, कमांडर, कॉमन सेलर, कॉमन बॅरन, कॉमन मॅप. कॉमन कॅस्टर, ब्ल्यू पॅन्सी, चॉकलेट पॅन्सी, ग्रे पॅन्सी, लेमन पॅन्सी, पीकॉक पॅन्सी, येलो पॅन्सी, डॅनाइड एगफ्लाय व सह्याद्री ब्ल्यू ओकलीफ आदी.  

 जलस्रोतांच्या संवर्धनासाठी, निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या घटकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हवामान बदलाचा अंदाज घेण्याची नैसर्गिक क्षमता या नैसर्गिक जिवांमध्ये असते. त्याचे निरीक्षण करून त्यांचा अधिक अभ्यास करायला आणि अन्नसाखळीतील एक घटक वाचवायला हवा.  - दत्तात्रेय लांघी, पर्यावरणप्रेमी  

Web Title : सिंहगढ़ की बर्ड वैली में तितलियों की विविधता, प्रकृति प्रेमियों को आकर्षित करती है।

Web Summary : सिंहगढ़ की बर्ड वैली में विभिन्न प्रकार की तितलियों का जीवंत जमावड़ा हो रहा है। पर्यावरणविद इन रंगीन प्राणियों को कैद करने के लिए उमड़ रहे हैं, जिनमें ब्लू टाइगर और कॉमन क्रो जैसे प्रवासी भी शामिल हैं। वे भोजन के लिए नम क्षेत्रों की तलाश करते हैं, और उनकी उपस्थिति संरक्षण प्रयासों की आवश्यकता पर प्रकाश डालती है।

Web Title : Butterfly diversity thrives in Sinhagad's Bird Valley, attracting nature lovers.

Web Summary : Sinhagad's Bird Valley is witnessing a vibrant gathering of diverse butterflies. Environmentalists flock to capture these colorful creatures, including migrants like the Blue Tiger and Common Crow. They seek damp areas to feed, and their presence highlights the need for conservation efforts.