दहावी-बारावीतील काॅपीप्रकरणी आतापर्यंत ८१ कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:48 IST2026-03-08T10:48:05+5:302026-03-08T10:48:55+5:30

- तीन संस्थेच्या सहा शाळांमधील २८ कर्मचारी निलंबित केले आहे.

pune news 81 employees suspended so far in 10th-12th class copying case | दहावी-बारावीतील काॅपीप्रकरणी आतापर्यंत ८१ कर्मचारी निलंबित

दहावी-बारावीतील काॅपीप्रकरणी आतापर्यंत ८१ कर्मचारी निलंबित

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत यंदा सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुराव्यासह ‘मास काॅपी’चे प्रकार उघड झाले. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ८१ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

अधिक माहितीनुसार, बारावी बाेर्ड परीक्षेत बीड जिल्ह्यात चाैसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक २२४) काॅपी प्रकार झाल्याचे उघड झाले आणि प्रशासनाने येथील १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित केले आहे. पहिल्याच पेपरला अर्थात १० फेब्रुवारीला हा प्रकार घडला हाेता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय जैतापूर येथे केंद्र क्रमांक-००७९ येथे मास काॅपीचा प्रकार घडला. यात पर्यवेक्षक केंद्र संचालक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचे सीसीटीव्हीवरून निदर्शनास आल्याने संबंधित २४ जणांविरुद्ध गुन्हा नाेंदवला असून, २१ जणांना निलंबित केले आहे. याचबराेबर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात केंद्र क्रमांक- ०४३९, ०४२३ आणि ०४२१ येथे इंग्रजी विषयाच्या पेपरला विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्त ०५ शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही केलेली आहे.

केंद्र क्रमांक ९०६ श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, जमुडाफाटा येथे १६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र विषयाच्या लेखी परीक्षेत ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे निदर्शनास आले, प्रयोगशाळा परिचर यांच्याकडे मोबाइल आढळला आहे. तीन संस्थेच्या सहा शाळांमधील २८ कर्मचारी निलंबित केले आहे. गडचिरोली येथील ब्रोमनवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ६१५ येथे राज्यशास्त्र विषयाच्या मायक्रोनोट व चॅट जीपीटी प्रिंटआउट काढलेल्या आणि सामूहिक कॉपी प्रकार आढळला. या प्रकरणी तीन शिक्षक व एक शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करत या सर्वांना निलंबित केले आहे.

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील परीक्षा केंद्र क्र. ३९३ जि. प. हायस्कूल, सलगरा येथे १८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र या विषयाला नऊ विद्यार्थी गैरमार्ग करीत असताना आढळून आले. यात सहा विद्यार्थ्यांकडे मोबाइल आढळून आले. या प्रकरणी संबंधित संस्थेतील तीन शिक्षक निलंबित केले, तसेच जिल्हा परिषद तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रस्तावित केले आहे.

याशिवाय दहावी परीक्षेत बीड जिल्ह्यातील कुर्ला तालुक्यात यशवंत विद्यालय येथे परीक्षा केंद्र क्र. २०५६ येथे परीक्षार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक यांना निलंबित केलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात बेटमोगरा येथे परीक्षा केंद्र क. ५२३१ जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तोतया विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल घेत परीक्षक व परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख यांना निलंबित केले आहे. 

Web Title : महाराष्ट्र बोर्ड परीक्षा में नकल: सामूहिक धोखाधड़ी के बीच 81 कर्मचारी निलंबित

Web Summary : महाराष्ट्र की 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षाओं में सामूहिक नकल की घटनाओं के बाद 81 कर्मचारियों को निलंबित कर दिया गया है। सीसीटीवी फुटेज में कई जिलों में व्यापक धोखाधड़ी का खुलासा हुआ, जिसके कारण बीड, छत्रपति संभाजीनगर, जालना, गढ़चिरौली, धाराशिव और नांदेड़ में शिक्षकों और प्रशासकों की गिरफ्तारी और निलंबन हुआ।

Web Title : Maharashtra Board Exam Copying: 81 Staff Suspended Amid Mass Cheating

Web Summary : Following mass copying incidents in Maharashtra's 10th and 12th board exams, 81 staff members have been suspended. CCTV footage revealed widespread cheating across multiple districts, leading to arrests and suspensions of teachers and administrators in Beed, Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Gadchiroli, Dharashiv and Nanded.