Pune airport : पुणे विमानतळावरून शनिवारी इंडिगोच्या ६९ विमानांचे उड्डाण रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:14 IST2025-12-07T13:13:19+5:302025-12-07T13:14:02+5:30
-हवाई वाहतूक मंत्रालयाने भाडेदरात मर्यादा लागू केल्यामुळे प्रवाशांना दिलासा

Pune airport : पुणे विमानतळावरून शनिवारी इंडिगोच्या ६९ विमानांचे उड्डाण रद्द
पुणे : लोहगाव विमानतळावर शनिवारी (दि. ६) रोजी ३ हजार ५०९ प्रवाशांचे आगमन झाले, तर ३ हजार ६५० प्रवाशांनी प्रस्थान केले आहे. दिवसभरात एकूण २२ विमानांचे आगमन, तर २५ विमानांचे उड्डाण झाले आहे. मात्र, यामध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या ३४ विमानांचे आगमन आणि ३५ विमानांचे उड्डाण असे एकूण ६९ विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे. त्यामुळे पुणेविमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.
पुणे विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या आणि बाहेरून पुण्यात येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्याचा फटका हजारो प्रवाशांना अजूनही बसत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली ही परिस्थिती शनिवारीही कायम होती.
सेवेवर परिणाम होत आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या सततच्या व्यत्ययांमध्ये देखील सुरळीत कामकाज आणि प्रवाशांना मदत मिळावी यासाठी पुणे विमानतळ प्रशासन सातत्याने समन्वय साधत आहे. तसेच सर्व सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
- एअर इंडिया : ०३/०३
- अलायन्स एअर : ००/००
- इंडिगो : ०७/१०
- स्पाइसजेट : ०१/०१
- एआयएक्स : ०५/०५
- अकासा एअर : ०३/०३
- स्टार एअर : ०१/०१
- फ्लाय ९१ : ०२/०२
----------------------------
उड्डाणे रद्द करणे (आगमन/निर्गमन)
- एअर इंडिया : ००/००
- अलायन्स एअर : ००/००
- इंडिगो : ३४/३५
- स्पाइसजेट : ००/००
- एआयएक्स : ००/००
- अकासा एअर : ००/००
- स्टार एअर : ००/००
- फ्लाय ९१ : ००/००
ऐनवेळी विमान रद्द होणे, सणासुदीचा कालावधी आणि सुट्ट्यांमध्ये विमान कंपन्या प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने वाढ करतात. सर्वसामान्य प्रवाशांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी भाड्यावर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५०० ते १५०० किलोमीटर व त्यापुढील अंतरासाठी ठरवलेल्या कमाल भाड्याच्या दरात मर्यादा लागू केल्यामुळे हवाई प्रवास प्रवाशांच्या आवाक्यात राहील. - मुरलीधर मोहोळ, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री उड्डाणे (आगमन / निर्गमन)