शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:21 IST

Pune Extra ST Buses for Diwali 2025: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

पुणे : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व जादा बस दि. १५ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गावी जाण्याची व्यवस्था होणार आहे.नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील पुण्यात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. दिवाळीसाठी हे नागरिक गावी जातात. सध्या रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात एसटीला कायम गर्दी असते. खास करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. त्यासाठी एसटीकडून जादा बसची सोय केली जाते. यंदा दिवाळीच्या काळात नियमित बस व्यतिरिक्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. जादा बसचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकतात. तसेच, एसटीच्या अधिकृत तिकीट बुकिंग केंद्रावर तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.

मराठवाडा, विदर्भासाठी ३९६ जादा बस :

मागील काही वर्षे दिवाळीच्या काळात खडकी कँन्टोमेंट येथून मराठवाडा, विदर्भासाठी जादा बस सोडण्यात येत होत्या. पण, यंदा खडकीची जागा योग्य नसल्यामुळे एसटी महामंडळाकडून नवीन जागेचा शोध घेतला जात होता. वाकडेवाडी बसस्थानकासमोर आरेची जागा देण्याची मागणी एसटीकडून करण्यात आली होती. पण, ही जागा पीएमआरडीएच्या ताब्यात असल्याने त्यांनी ही जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला.

 स्वारगेट येथून ११३ जागा बस :पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी स्वारगेट एसटी बसस्थानक येथून नियमित बसबरोबरच ११३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत. यावेळी दररोज धावणाऱ्या निमयित गाड्या सुरू असणार आहेत. स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून महामंडळाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानक ----- बस संख्याशिवाजीनगर----- ८०स्वारगेट---- १२२पिंपरी-चिंचवड --- ३९६

एकूण ----- ५८९ 

दिवाळीसाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून १५ ऑक्टोबरपासून जादा बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित बसदेखील सुरू असणार आहेत. दिवाळीच्या काळात तिकिटामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी बसने जादा तिकीट देऊन प्रवास करणे टाळावे. प्रवाशांनी एसटीला प्राधान्य द्यावे. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune to Run 589 Special Buses for Diwali

Web Summary : For Diwali, Pune will operate 589 special buses from October 15th to November 5th. These buses cater to Marathwada, Vidarbha, and western Maharashtra routes, departing from Pimpri-Chinchwad, Swargate and Shivajinagar, with online booking available.
टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेpassengerप्रवासीswargateस्वारगेटswargate bus depotस्वारगेट बसस्थानक