आम्हाला वाचवा..! दुबईतील हॉटेलमध्ये पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; माजी नगरसेविकेचाही समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:11 IST2026-03-02T12:08:01+5:302026-03-02T12:11:10+5:30

सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी देखील यासाठी प्रयत्न करावेत,’’ अशी विनंती दुबईमध्ये अडकलेल्या पुणेकरांनी केली आहे.

pune news 40 people from Pune-Pimpri trapped in a hotel in Dubai; Former corporator also included | आम्हाला वाचवा..! दुबईतील हॉटेलमध्ये पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; माजी नगरसेविकेचाही समावेश 

आम्हाला वाचवा..! दुबईतील हॉटेलमध्ये पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; माजी नगरसेविकेचाही समावेश 

पुणे : ‘‘आम्ही दुबईमधील एका हॉटेलमध्ये अडकलो आहोत. पुणे आणि पिंपरीचे मिळून आम्ही ४० जण आहोत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. सर्वजण खूप घाबरले आहेत. भारत सरकारने काहीही करून आम्हाला इथून घेऊन जावे. सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी देखील यासाठी प्रयत्न करावेत,’’ अशी विनंती दुबईमध्ये अडकलेल्या पुणेकरांनी केली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर शनिवारी हल्ले केले आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी भारतातून दुबईला गेलेल्या अनेक नागरिकांना तिथेच अडकून पडावे लागले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सुमारे ४० जण दुबईला फिरायला गेले आहेत. ते सर्वजण सुखरूप असून, दुबईमध्ये ब्रो खोलपा जवळील एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. माजी नगरसेविका सुमन नेटके, अनिता नेटके यांचाही समावेश आहे. त्यातील जगदीश या तरुणाने व्हिडिओ करून भारत सरकारकडे त्यांना सोडविण्याची विनंती केली.

जगदीश म्हणाले, आम्ही चाळीस मंडळी दुबईमध्ये आहोत. आमचे भारत व महाराष्ट्र सरकारला निवेदन आहे की, त्यांनी आमची लवकर सोडवणूक करावी. आमच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. सर्व राजकीय पक्षांची, नेत्यांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी आमची सोडवणूक करावी आणि भारतामध्ये सुखरूप न्यावे. आम्हाला सर्वांनी वाचवावे. इथे सर्वजण खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आमच्या हॉटेलजवळच बॉम्ब हल्ला झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथून आमची सुटका करावी.’’

Web Title : दुबई में फंसे: पुणे, पिंपरी के 40 निवासियों ने बचाव की गुहार लगाई

Web Summary : ईरान में हमलों के बाद, पुणे और पिंपरी-चिंचवड के 40 निवासी, जिनमें वरिष्ठ नागरिक और पूर्व पार्षद शामिल हैं, दुबई के एक होटल में फंसे हुए हैं। वे पास के बम विस्फोटों के बाद अपनी सुरक्षा के डर से भारत सरकार और राजनीतिक नेताओं से सुरक्षित निकासी के लिए तत्काल अपील करते हैं।

Web Title : Stranded in Dubai: 40 Pune, Pimpri Residents Plead for Rescue

Web Summary : Following attacks in Iran, 40 residents of Pune and Pimpri-Chinchwad, including senior citizens and ex-corporators, are stranded in a Dubai hotel. They urgently appeal to the Indian government and political leaders for safe evacuation, fearing for their safety after nearby bombings.