शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पुणे महापालिकेच्या आरोग्य परवाना शुल्कात वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 2:32 PM

महापालिका प्रशासनाच्या विविध विभागाच्या वतीने वेगवेगळ्या स्वरुपांचे परवाने..

ठळक मुद्देदर तीन वर्षांनंतर परवाना फीमध्ये पाच टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील लॉजिंग, मंगलकार्यालय, सलून, ब्यूटी पार्लर, अंडाविक्री, धान्यभट्टी, आईस फॅक्ट्री, पानपट्टी, रसगुल्ला, घरगुती वापरासाठी पाळीव जनावरे व खासगी जनावरे यांच्यासाठी आदी सर्वांना आरोग्य परवाने दिले जातात. या परवान्यांच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. येत्या मंगळवारी (दि.७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. महापालिका प्रशासनाच्या विविध विभागाच्या वतीने वेगवेगळ्या स्वरुपांचे परवाने दिले जातात. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या परवाना शुल्कामध्ये सन २००५ पासून कोणत्याही स्वरूपाची वाढ केली नाही. परंतु आता येत्या १ एप्रिलपासून आरोग्य परवाने नवीन शुल्कवाढीनुसार देणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सुधारित दर प्रस्तावित केले आहेत. तसेच  त्यानंतर दर तीन वर्षांनंतर परवाना फीमध्ये पाच टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य परवाना फी व्यतिरिक्त नूतनीकरणाच्या वेळी विलंब फी आणि तडजोड फी आकारली जाते. सध्या विलंब फी ६ रुपये आणि तडजोडी फी परवाना फीच्या २५ टक्के आहे. आता या विलंब फीमध्ये वाढ प्रस्तावित करुन ३० रुपये केली आहे, मात्र तडजोड फीमध्ये कुठल्याही प्रकारे वाढ केलेली नाही. आरोग्य परवाना फॉर्मचे शुल्क एक रुपयावरून दहा रुपये केले आहे.हंगामी उसाचे गुऱ्हाळ चारशे रुपयावरुन दोन हजार आणि कायम स्वरूपी उसाचे गुऱ्हाळ सहाशेवरुन दोन हजार रुपये शुल्क सुचविले आहे. नसबंदी केलेल्या कुत्र्याला पन्नासवरुन अडीचशे रुपये, नसबंदी न केलेला कुत्र्यासाठी परवाना शुल्क पाचशे रुपये आकारण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. ...आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या परवाना शुल्कामध्ये सन २००५ पासून कोणत्याही स्वरूपाची वाढ केली नाही.........प्रस्तावित दर व वाढीव दर व्यवसायाचे नाव    सध्याचे दर    प्रस्तावित दर हेअर कटिंग    ५०    २५ब्यूटी पार्लर    ४००    २०००पानपट्टी    ८०    ४००अंडा विक्री    ८०    ४००पोल्ट्री    ३५०    १७५० धान्य भट्टी    २००    १०००मंगल कार्यालय २०० चौरस     ३०००    १५०००२०० चौरस मीटर पुढे       ५०००    २५००० ........४शहरात गाय, म्हैस, बैल, रेडा यांच्यासाठी प्रतिजनावर ४० रुपये शुल्क होते. ते आता दोनशे रुपये केले जाणार आहे. घोड्याच्या तडजोड फीचे ऐंशीवरुन चारशे, हत्तीचे शंभर रुपयावरुन पाचशे रुपये, शेळ्या-मेंढ्यांचे शुल्क शंभरवरून दोनशे रुपये प्रस्तावित केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य