शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : अपक्षांची मते घटली, मनसे, आपपेक्षाही नोटाला अधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:43 IST

- २०१७ च्या तुलनेत नोटाला ४९ हजार ६४१ अधिक मते; मतविभाजनाचा राष्ट्रवादीला २१ जागांवर फटका

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत मनसेला १ लाख ५५ हजार ७८८ तर आम आदमी पार्टीला ५० हजार ५१७ मते मिळाली आहेत. त्यापेक्षा जास्त मते पुणेकरांनी नोटाला तब्बल २ लाख २१ हजार २२२ मते दिली आहेत. २०१७ च्या पालिका निवडणुकीत १ लाख ७१ हजार ५८१ नोटाला मते होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा नोटाला ४९ हजार ६४१ मते वाढली आहेत. २०१७ च्या पालिका निवडणुकीपेक्षा अपक्ष उमेदवारांना १ लाख ८८ हजार ४४१ मते कमी मिळाली आहेत. पालिका निवडणुकीत मतविभाजनामुळेच भाजप ११९ च जागा मिळू शकले आहे. या मतविभाजनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २१ , काँग्रेसचे ४, शिंदेसेना १ आणि उद्धवसेनेच्या २ उमेदवारांचा पराभव झाला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप ११९, दोन्ही राष्ट्रवादी ३०, काँग्रेस १५ आणि उद्धवसेना १ जागा मिळाली आहे. मनसे, शिंदेसेना, आपला एकही जागा मिळालेली नाही. पुणे महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग होता. त्यामुळे एक मतदाराला चार मते द्यायची होती. त्यामुळे या निवडणुकीत ७४ लाख ६३ हजार ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यात नोटाला २ लाख १६ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे पुणेकरांनी ‘नोटा'चा पर्याय निवडला असून, हे एकूण मतदानाच्या जवळपास ३ टक्के आहे. पुणे महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पार्टीला ५० हजार ५१७ तर मनसेला १ लाख ५५ हजार ७८८ मते मिळाली आहेत. मनसे आणि आप पेक्षाही नोटाला अधिक मते मिळाली आहेत. ‘नोटा'ला मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील मतांमुळे मतदारांमधील असंतोष आणि राजकीय पर्यायांविषयीची नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

......

मतविभाजनाचा या प्रभागात भाजपला फायदा

भाजपला रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर, कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा, मांजरी बुद्धक-केशवनगर-साडेसतरानळी, हडपसर-सातववाडी, मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क, नवी पेठ-पर्वती

जनता वसाहत-हिंगणे खुर्द, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी, सहकारनगर-पद्मावती, धनकवडी-कात्रज डेअरी, बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज, अप्पर-सुपर इंदिरानगर या प्रभागामध्ये मतविभाजनाचा फायदा झाला आहे.

..........

भाजपला तीन प्रभागात एकही जागा मिळाली नाही

महापालिका निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात पुणे महापालिकेच्या ४१ पैकी फुलेनगर-नागपूर चाळ, येरवडा-गांधीनगर, कोंढवा खुर्द कौसरबाग या तीन प्रभागांमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नाही. १८ प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनेल विजयी झाले आहे. उर्वरित १० प्रभागांमध्ये तीन, सूस-बाणेर-पाषाण, हडपसर-सातववाडी, वानवडी-साळुंखे विहार, रविवार पेठ-नाना पेठ, जनता वसाहत-हिंगणे खुर्द, शिवणे-खडकवासला धायरी पार्ट, महंमदवाडी-उंड्री या सात प्रभागामध्ये दोन जागा मिळाल्या आहेत. गोखलेनगर - वाकडेवाडी, रामबाग कॉलनी - शिवतीर्थनगर आणि पुणे स्टेशन-जयजवान नगर या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे.

.........

राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे ८ उमेदवार पडले

भाजपविरुद्ध लढताना मतविभाजनाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसलाही बसला आहे. काँग्रेसच्या १४ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये आठ ठिकाणी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे.

.........

अपक्ष उमेदवारांना १ लाख ८८ हजार ४४१ मते

पुणे महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत ४ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. २०१७च्या निवडणुकीत अपक्षांना ३ लाख ३५ हजार ७१९ मते मिळाली होती. आताच्या पालिका निवडणुकीत अपक्षांना १ लाख ४७ हजार २७८ मते मिळाली आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना १ लाख ८८ हजार ४४१ मते इतकी मते मिळाली असून, ती २०१७ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहेत.

पुणे महापालिका निवडणूक

पक्षाचे नाव २०१७ मिळालेली मते २०२६ मिळालेली मते

भाजप : २१ लाख २८ हजार ४५२                         ३२ लाख १८ हजार ६६४

काँग्रेस : ५ लाख ९८०             ६ लाख ३२ हजार ९२४

राष्ट्रवादी काँग्रेस : १२ लाख ७३ हजार ५२४             .................

शिवसेना : ८ लाख २३ हजार ७४४             ...........................

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) : ...............                         १७ लाख ८६ हजार १७२

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) :....................             २ लाख ८८ हजार २००

शिंदेसेना : ....................................             ५ लाख २२ हजार १३८

उद्धवसेना :.................. ३ लाख ११ हजार ६६९

अपक्ष : ३ लाख ३५ हजार ७१९             १ लाख ४७ हजार २७८

आप : ................... ५० हजार ५१७

मनसे : ३ लाख ७३ हजार ६४५             १ लाख ५५ हजार ७८८

नोटा : १ लाख ७१ हजार ५८१             २ लाख २१ हजार २२२

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Election: NOTA Beats MNS, AAP; Independents' Vote Share Dips

Web Summary : Pune saw BJP win 119 seats, but NOTA votes surpassed MNS and AAP. Independent votes declined significantly compared to 2017. Vote division aided BJP in key areas, impacting Congress and Shiv Sena factions.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPMC Bankपीएमसी बँक