पुणे : पुणे महापालिकेच्या १९ पैकी केवळ दोनच प्रसूतीगृहांमध्ये गर्भवती महिलांना पूर्ण सकस आहार दिला जात होता. परंतू, आता पालिकेच्या सर्वच प्रसूतीगृहांमध्ये गर्भवती महिलांना पूर्ण सकस आहार देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत मंगळवारी मान्यता देण्यात आली. शहरातील प्रसूतीगृहांमध्ये सिझर डिलिव्हरी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निर्दशनास आले आहे. गर्भवती महिलांना योग्य व सकस आहार देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करून घेणे, योग्य औषधे देणे अत्यावश्यक असून यावर उपाय योजना केल्यास सिझर डिलिव्हरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे पुणे महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहात पुणे शहरातील आर्थिक दुर्बल व गोरगरिब कुटुंबातील गर्भवती महिलांना पूर्ण व सकस आहार देण्याबाबतचा ठराव विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. त्यानुसार शहरातील पालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये आता पूर्ण सकस आहार देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनास दिले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.----------------------------------
पुणे महापालिकेच्या १९ प्रसूतीगृहांमध्ये आता मिळणार पूर्ण सकस आहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 18:08 IST
गर्भवती महिलांना योग्य व सकस आहार देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य
पुणे महापालिकेच्या १९ प्रसूतीगृहांमध्ये आता मिळणार पूर्ण सकस आहार
ठळक मुद्देगर्भवती महिलांना पूर्ण व सकस आहार देण्याबाबतचा ठरावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता