शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निष्पापांचा बळी गेल्यावर पुणे महापालिकेला सुचले शहाणपण :उंचावरचे फ्लेक्स काढणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:14 PM

होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला.

पुणे : होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. आयुक्त सौरव राव यांनी येत्या एक महिन्याच्या आत शहरातील ४० फूट उंचीवरचे सर्व होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

                 आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देता आली नाहीत.अखेर आयुक्तांना यात मध्यस्थी करावी लागली व सदस्यांचे समाधान करावे लागले. होर्डिंग धोरणातील नियमांची अंमलबजावणी करण्याचे तसेच ४० फूट उंचीवरील लोखंडी सांगाडा असलेले सर्व होर्डिंग्ज एका महिन्यात काढून टाकण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यावर सदस्य शांत झाले. तरीही क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग स्तरावरील अधिकारी जाहीरातदार कंपन्या, एजन्सी यांच्याकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप केला. दुर्घटनेतील होर्डिंग काढून घेण्याबाबत रेल्वे प्रशासनाला लेखी कळवले असल्याचे समर्थन महापालिका अधिकारी करत असले तरी ७ वेळा पत्र पाठवून त्यांनी एकप्रकारे दुर्लक्षच केले आहे, त्यामुळे त्यांनाही यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

              सभेच्या कामकाजाला महापौर मुक्ता टिळक यांनी सुरूवात करताच दिलीप बराटे यांनी जाहिरात फलकांचा विषय उपस्थित केला. प्रशासन सांगत असलेली अनधिकृत होर्डिंग्जची संख्या हास्यास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याविषयाची सर्व खरी आकडेवारी त्यांनी मागितली. काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी होर्डिग धोरणाचे काय झाले असा सवाल करत याविषयाची पाळेमुळेच खणून काढली. इतका मोठा अपघात झाल्यानंतरही आकाशचिन्ह विभागाला त्याचे गांभीर्य नाही, कारवाई करायला त्यांचे मन होत नाही अशी टीका त्यांनी केली. शहरात किमान अडीच लाख तरी होर्डिग्ज उभी असावीत असे त्यांनी सांगितले.

             महापालिकेने तयार केलेल्या होर्डिंग धोरणाला प्रशासनाने जाणीवपुर्वक विलंब लावला. त्यातील नियमांचे सोयिस्कर अर्थ लावले असा आरोप सुभाष जगताप यांनी केला. सन २००३ मध्ये हे धोरण तयार केले त्यात आपण स्वत: होतो.  त्यात प्रशासनाने सोयीचे तेवढे घेतले गेले व गैरसोयीचे वेगळा अर्थ लावत लांबवले गेले असे जगताप म्हणाले. जाहीरात फलकाचा दर प्रशासनाने तत्कालीन स्थायी समिती व सर्वसाधारण सभा यांची मान्यता न घेताच ठरवला, त्याची अंमलबजावणीही सुरू केली. न्यायालायने आक्षेप घेतल्यानंतर त्याला अलीकडेच मान्यता घेण्यात आली असे त्यांनी निदर्शनास आणले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सरकारच्याच आदेशाने काही कंपन्यांना तत्कालीन आयुक्त व अधिकाºयांनी अभय दिले असा आरोप केला. शिवसेनेच्या संजय भोसले यांनी कारवाई कधी करणार ते सांगा असा सवाल केला.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी प्रशासनाने या गोष्टींचा खुलासा करावा, अशी मागणी करत प्रशासनावरील आक्षेपांची जंत्रीच सादर केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, नियमात चुकला तो कोणीही असो त्याला दंड करा असेच सांगत आलो आहोत. नगरसेवकांना किंवा सत्ताधाºयांनाही कारवाई करा असे सांगण्याची वेळच आली नाही पाहिजे.

            आयुक्तांनी खुलासा करताना सदस्यांच्या भावनांची दखल घेत याबाबत झालेल्या सर्व चुकांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सर्वप्रथम ४० फूटांपेक्षा जास्त उंच असलेले सर्व फलक एक महिन्यात काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. खासगी जागेतील फलकांनाही धोरणातील सर्व नियम लागू केले जातील. ज्या जाहीरात संस्थेला अभय दिले त्याची चौकशी करू, खटले किती आहे, नोटीसा किती दिल्या आहेत, परवानग्या किती याची सखोल माहिती घेऊ असे त्यांनी सांगितले. याविषयारील चर्चेत सत्ताधारी अजय खेडेकर, गोपाळ चिंतल, हरिदास चरवड यांनी तसेच विरोधकांमधील नाना भानगिरे, योगेश ससाणे, प्रिया गदादे, बाळा ओसवाल, सुनिल टिंगरे यांनी सहभाग घेतला.

एका जाहीरात कंपनीला सरकारमधूनच अभय मिळाले. मंत्री पंकजा मुंडे यांचा आशिर्वाद असलेली ही कंपनी आहे. तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानेच त्यांच्याबरोबरच्या कराराचे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असूनही नुतनीकरण करण्यात आले. याची चौकशी करावी व दोषी अधिकाºयांवरही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी.

-अरविंद शिंदे,कॉँग्रेस गटनेते

  • जाहीरात करणाºया कंपन्या व प्रशासनातील काही अधिकारी यांची हातमिळवणी आहे. रेल्वेला नोटीस दिली त्यात एक वाक्य, तुम्ही होर्डिग काढले नाही तर ते आम्ही काढू असे आहे. मग महापालिकेने कारवाई का केली नाही. ती झाली असती तर चारजणांचा जीव हकनाक गेला नसता. संबधित अधिकाºयांनाही यात जबाबदार धरावे.

-सुभाष जगताप, नगरसेवक

  • प्रशासन खोटे बोलत आहे. चार जणांना प्राण गमवावे लागले त्याचे यांना अजूनही काहीच वाटत नाही. त्यानंतर तरी प्रशासनाने शहरातील सर्व अनधिकृत होर्डिग्ज काढून टाकायला हवी होती. मात्र अशी कारवाई झालेली नाही. चुकीची आकडेवारी देत दिशाभूल केली जात आहे.

-अविनाश बागवे,नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAccidentअपघात