पुणे महापालिकेला आली जाग; नाट्यगृहातील उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाययोजनेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:58 IST2025-06-04T10:57:39+5:302025-06-04T10:58:15+5:30

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्याआधीही सगळीकडे उंदीर फिरत होते, महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरला होता

Pune Municipal Corporation Measures to prevent rat infestation in theaters begin | पुणे महापालिकेला आली जाग; नाट्यगृहातील उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाययोजनेला सुरुवात

पुणे महापालिकेला आली जाग; नाट्यगृहातील उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाययोजनेला सुरुवात

पुणे: पुणे महापालिकेच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग असताना महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरला होता. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासह सर्व नाट्यगृहामधील उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला पेस्टकंट्रोल केले जाणार आहे.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्याआधीही सगळीकडे उंदीर फिरत होते. महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरला होता. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्यावर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दखल घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील बल्लाळ यांच्यामध्ये उपाययोजनाबाबत चर्चा झाली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पालिकेच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासह सर्व नाट्यगृहामध्ये पेस्टकंट्रोल केले जाणार आहे. पुणे महापालिकेने नाट्यगृहामध्ये पेस्टकंट्रोल करण्यासाठी निविदा काढलेली नाही, पण आता हे काम आगोदर करून निविदेला पश्चता मान्यता घेतली जाणार आहे. पेस्टकंट्रोल केल्यानंतर त्या दिवशी नाट्यगृह बंद ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. प्रेक्षकांनीही नाट्यगृहात खाण्याचे पदार्थ नेऊ नयेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: Pune Municipal Corporation Measures to prevent rat infestation in theaters begin