शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तीन वसाहती कधीही कोसळू शकतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 12:25 IST

पालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी करावयाच्या आपत्कालीन कामांचे सर्वेक्षण सुरु आहे.

ठळक मुद्देपालिकेचा अहवाल : पावसाळ्यापुर्वी रहिवाशांचे स्थलांतर करणे अत्यावश्यक

पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरावस्था झालेली असून याविषयी अनेकदा तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. परंतू, पावसाळापूर्व करावयाच्या कामांमध्ये या चाळींचे सर्वेक्षण करण्यात आले. पालिकेच्या तीन वसाहतींच्या इमारतींमधील सदनिका राहण्यायोग्य नसून या इमारती पावसाळ्यामध्ये कोसळू शकतात असा अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या ३५० कुटुंबांचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. पालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी करावयाच्या आपत्कालीन कामांचे सर्वेक्षण सुरु आहे. धोकादायक वसाहतींचेही चाळ विभागाकडून सर्वेक्षण करुन घेण्यात आले. वाकडेवाडी येथील संभाजीनगर, घोरपडे पेठ कॉलनी क्रमांक ८ व ९, साने गुरुजी नगर येथील अंबिल ओढा वसाहतीमधील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. वाकडेवाडी येथील वसाहतीमध्ये एकूण नऊ इमारती आहेत. या इमारती तीन मजली असून याठिकाणी 288 सदनिकाधारक आहेत. या सर्व सदनिका राहण्यायोग्य नसल्याचे तसेच अत्यंत धोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच घोरपडे पेठेतील कॉलनी क्रमांक ८ मध्ये पाच आणि कॉलनी क्रमांक ९ मध्ये बारा अशा एकूण १७ इमारती आहेत. या सर्व इमारतींचे पालिकेच्या मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर साने गुरुजी नगर अंबिल ओढा वसाहतीमध्ये ११ इमारती असून दहा इमारती दोन मजली आहेत. तर एक इमारत तीन मजली आहे. याठिकाणी एकूण ४५५ सदनिकाधारक आहेत. यापैकी इमारत क्रमांक दहाही अत्यंत धोकादायक असून येथील २४ सदनिकाधारकांचे पावसाळ्यापुर्वी त्वरीत अन्यत्र स्थलांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. =====पाहणी अहवालातील ठळक निरीक्षणेबºयाचशा सदनिकांच्या टॉयलेट्स व बाथरुममध्ये गळती होत असून भिंतींमधून उगवलेल्या वड, पिंपळाच्या झाडांमुळे भेगा पडल्या आहेत. तसेच स्लॅब धोकादायक बनले आहेत. अनेकांच्या घरांमधील सिलिंगच्या प्लास्टरला तडे गेले असून स्लॅबचे स्टील उघड्यावर आले आहे. स्टीलला गंज चढल्याने ते कमकुवत बनले आहेत. काही इमारतींमधील पॅसेजमधील पॅरापेटाच्या भिंती पडायला आल्या आहेत. काही इमारतींमधील बीम व कॉलम जीर्ण झाल्याने इमारतींचा सांगाडा (आरसीसी स्ट्रक्चर) धोकादायक बनले आहे. काही ठिकाणी पॅसेजला बाक आला असून त्याला आधार देण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी सज्जे तुटलेले आहेत. तर काही इमारती पुढील बाजूस झुकल्या आहेत. यासोबतच पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामधून दुषित पाणीपुरवठा होत आहे. मैलापाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईन्स व ड्रेनेज चेंबर्स घूस लागल्याने तुंबत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना