शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अजित पवार गटाची जोरदारातयारी सुरू; दोन माजी उपमहापौरांचा पक्षप्रवेश, शरद पवार गटाला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:04 IST

विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हडपसर हा मतदारसंघ महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसाठी सर्वाधिक यशस्वी ठरलेला असून, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकट्या हडपसर मतदारसंघातून 17 ते 18 नगरसेवक निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतरही अजित पवार यांच्या गटाने या मतदारसंघावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.

आता हे वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी अजित पवार पावलं उचलत असून, शरद पवार गटातील दोन माजी उपमहापौर आणि एक माजी नगरसेवक यांना आपल्या गोटात खेचले आहे. हडपसरमधील माजी उपमहापौर निलेश मगर आणि बंडू तात्या गायकवाड हे आज अधिकृतरित्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक योगेश ससाने यांचाही पक्षप्रवेश होणार आहे.

ही घटना शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानली जात असून, विशेष म्हणजे याच मतदारसंघातून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे येतात. त्यांच्या मतदारसंघातूनच अशा महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने, प्रशांत जगताप यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जातो.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार