पुणे : महापालिकेच्या सारस बागेजवळील सणस मैदानावर महापौर चषक स्पर्धेचा कार्यक्रम घेण्यात आला असून लहान मुलांमुळे सिंथेटिक ट्रॅक खराब होतो’ असे कारण देत १० वर्षांखालील मुलांना मैदानावर बंदी घालणऱ्या महापालिकेच्या क्रिडा विभागाची दुटप्पी भुमिका यानिमित्ताने समोर आली आहेत.
महापालिकेने २००६ मध्ये सारसबागेच्या शेजारील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या सात एकर जागेवर कै. बाबूराव सणस मैदान विकसित केले. शहरात एथलेटिक्स खेळाडू तयार व्हावेत, यासाठी या मैदानावर ४०० मीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार केला आहे. या मैदानावर लांब उडी व तिहेरी उडीसाठी दोन ठिकाणी स्वतंत्र पिट आणि भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज आदीसाठी देखील मैदान तयार केले होते. महापालिकेच्या भवन विभागाने ८ कोटी रुपये खर्डूच करून ४०० मी. ८ लेन सिंथेटिक ट्रॅकचे नूतनीकरण केले. तसेच ट्रॅकच्या आतील भागात असलेल्या मैदानावर लॉन करण्यात आले आहे. महापालिकेच्या २०१३ च्या क्रीडा धोरण नियमावलीनुसार मैदानाचा व सिंथेटिक ट्रॅकचा वापर होत आहे.
मात्र, क्रीडा विभागाने ‘लहान मुलांमुळे ट्रॅक खराब होतो’ असे कारण देत १० वर्षांखालील मुलांना मैदानावर बंदी घातली. या बंदीच्या विरोधात पालकांनी व विविध संघटनांनी आवाज उठवून ही बंद मागे घेण्याची मागणी केली. मात्र, या मागणीला यश मिळालेले नाही. दुसरीकडे याच क्रिडा विभागाने सणस मैदानावर मंगळवारी सायंकाळी महापौर चषक क्रिडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी सिंथेटिक स्ट्रॅकवर झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय मैदानाच्या आतमध्ये मोठा स्टेज उभारून मोठ्या प्रमाणात लायटींग करण्यात आली होती. सिंथेटिक ट्रॅक खराब होतो, म्हणून मुलांच्या प्रवेशावर बंदी घालणाऱ्या क्रिडा विभागाने कार्यक्रमाचा स्टेज, लाईट, एलईडीची उभारणी करणाऱ्या कामगारांना आणि कार्यक्रमासाठी येणाऱ्यांच्या पायामुळे सिंथेटिक ट्रॅक खराब होऊ नये, म्हणून कोणती काळजी घेतली होती? हा कार्यक्रम घेण्यासाठी इतर मैदाने उपलब्ध नव्हती का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
‘लहान मुलांच्या लहान मुलांच्या शुजमुळे सिंथेटिक ट्रॅक खराब होतो’ असे कारण देत १० वर्षांखालील मुलांना मैदानावर बंदी घातली. खासदार चषक आणि महापौर चषक स्पर्धेसाठी ८ कोटी खर्च केलेल्या मैदानांवर लहान मुलांना प्रवेश. लहान मुलांना सरावास बंदी, मात्र, स्पर्धेसाठी प्रवेश. मुलांच्या शुजमुळे सिंथेटिक ट्रॅक खराब होतो, पण कार्यक्रमामुळे नाही. हा क्रिडा विभागाचा दुटप्पी पणा आहे. - अनंत घरत, प्रसिद्धी प्रमुख, उद्धव सेना
Web Summary : Pune Municipal Corporation bans children from Sanas ground citing track damage, yet hosts a Mayor Cup event there. This sparks outrage, exposing the hypocrisy of prioritizing events over young athletes' access to facilities. Questions arise about track protection during the event.
Web Summary : पुणे महानगरपालिका ने ट्रैक को नुकसान का हवाला देते हुए सणस मैदान में बच्चों पर प्रतिबंध लगाया, लेकिन महापौर कप कार्यक्रम का आयोजन किया। इससे आक्रोश फैल गया, जिससे युवा एथलीटों की पहुंच से ऊपर आयोजनों को प्राथमिकता देने का पाखंड उजागर हुआ। कार्यक्रम के दौरान ट्रैक सुरक्षा पर सवाल उठे।