पुणे : अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याकडून 3 वर्ष सुरू होता अत्याचार, नराधम बाप अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 10:54 IST2018-01-31T10:53:16+5:302018-01-31T10:54:06+5:30

आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 3 वर्षांपासून सावत्र बापाकडून अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे.

Pune: minor girl Molested for 3 years by stepfather | पुणे : अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याकडून 3 वर्ष सुरू होता अत्याचार, नराधम बाप अटकेत

पुणे : अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याकडून 3 वर्ष सुरू होता अत्याचार, नराधम बाप अटकेत

पुणे : आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 3 वर्षांपासून सावत्र बापाकडून अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर या 34 वर्षांच्या तरुणाशी दुस-यांदा विवाह केला. 

काही दिवसांनंतर महिलेची मुलगी शाळेत शांत-शांत बसत असे. शाळेतील शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्याकडे चौकशी केली. परंतु भीतीपोटी तिने ही बाब शिक्षकांना सांगितली नाही.  तिच्या वागणुकीतील बदल अधिक जाणवू लागल्याने शेवटी त्यांनी मुस्कान या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. त्यांनी तिचे समुपदेशन केल्यानंतर तिने गेली 3 वर्षे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती तिनं दिली.  तिचे सावत्र वडील तिला अंघोळ घालण्याचे निमित्त करून तसेच घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करीत होता. 

हडपसर पोलिसानी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सावत्र वडिलांना अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Pune: minor girl Molested for 3 years by stepfather