शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

Pune Mini Lockdown : संचारबंदीची भीती; बेरोजगारीचे संकट; हॉटेलमधील कर्मचारी थेट आपलं गाव गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 12:15 AM

या परप्रांतीय कामगारांना मागच्यावेळी गाव गाठण्यासाठी चक्क प्रत्येकी वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत.

प्राची कुलकर्णी

पुणे: पुणे शहरात प्रशासनाने शनिवारपासून जमावबंदी आणि संचारबंदी जाहीर केली आहे.तसेच हॉटेल व रेस्टॉरंट ७ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे मोठे संकट ओढवले असून ते गावी परतण्याच्या तयारीत आहे. 

पुणे शहरात हॉटेल आणि रेस्टॉरंटची प्रचंड संख्या आहे. तसेच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे निश्चितपणे प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्णयामुळे आधीच मागच्या वर्षी अडचणीत आलेल्या या कर्मचाऱ्यांवर आता पुढे काय हा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे शहरातले हॉटेलमधले कर्मचारी पुन्हा एकदा गावाकडे जायला निघण्याच्या तयारीत दिसत आहेत. काहीही केलं तरी मागच्या वेळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नाही अशीच खुणगाठ त्यांनी बांधली आहे.  

उत्तराखंडचे रमेश शर्मा ( नाव बदलले आहे)  पुण्यातल्या एका हॅाटेलात स्वयंपाकी म्हणून काम करतात गेल्या लॅाकडाउन मध्ये परवानगी मिळत नाही म्हणून काही दिवस शहरात राहीले. पण त्याचा फटका इतका की गावी जायला त्यांना प्रत्येक वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत.

शर्मा म्हणाले ,” मागच्या संचारबंदीला हॉटेलकडून जेवढी होईल तेवढी मदत झाली होती. त्यानंतर संचारबंदीचे अजून दिवस १५ वाढवण्यात आले. मग आम्ही आमच्या गावी गेलो. कोणाचीही मदत न घेता प्रवासाला स्वतः खर्च केला. सरकारने तेव्हपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. रेस्टोरंट बंद असले तरी ते आमच्या राहण्याची आणि खाण्याची सोय ते करत आहेत. सरकार आमच्यासाठी काहींचं करत नाहीत. त्यातून त्यांनी संचारबंदी लागू करून ठेवली आहे. आम्ही परराज्यातून स्वतःच्या परिवारासहित या ठिकाणी आलो आहोत. या संचारबंदीत किराणा माल, भाजीपाला सर्व गोष्टींची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मग हॉटेल आणि रेस्टोरंट यांच्यावर का बंदी आणण्यात आली आहे." 

या परिस्थितीत उत्पन्न थांबलं आहे.  त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी हॅाटेल हेच त्यांचं घर बनले आहे. शिल्लक धान्यसाठा त्यांना शिधा पुरवतोय. पण हे किती दिवस चालणार हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. पुढे काय याचे उत्तर त्यांना मिळायला तयार नाही.

 एक कर्मचारी म्हणाला ,” पुण्यात सात दिवसांसाठी हॉटेल आणि रेस्टोरंट बंद करण्यात आले आहेत. मागच्या वेळी प्रमाणे ही संचारबंदी वाढत जाण्याची आम्हाला भीती वाटू लागली आहे. मी घरात एकटा कमवता आहे. दर महिन्याला घरभाडे भरण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. हॉटेलने राहण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे आम्ही इथेच राहत आहोत. घरी जाऊन कुटुंबियांना कुठं त्रास देणार म्हणून पर्याय नसल्याने येथे राहावे लागत आहे.” अर्थात परत फिरणे सोपे नाही याची जाणीवसुद्धा त्यांना आहे. 

 वेटरचे काम करणाऱ्या सुग्रीव म्हणाला, आम्हाला आता पुन्हा घरी जावे लागते की काय अशी भीती वाटू लागली आहे. संचारबंदी हा उपाय नाही. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या हॉटेल व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सद्यस्थितीत हॉटेलमधून आम्हाला सहकार्य होत आहे. आमचे पगार अजूनही थांबवले नाहीत. त्याचप्रमाणे राहण्याची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhotelहॉटेल