तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे 'एएफसी' गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:41 IST2026-03-05T10:41:19+5:302026-03-05T10:41:39+5:30

- या निर्णयामुळे विनातिकीट प्रवाशांना अटकाव होणार असून स्थानकावरील गर्दीचे नियोजन प्रभावीपणे होईल.

pune metros AFC gate will open only after scanning the ticket | तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे 'एएफसी' गेट

तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे 'एएफसी' गेट

पिंपरी : मेट्रोने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मंगळवार (दि.३) पासून स्थानकांवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेट्सच्या कार्यपद्धतीत मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना तिकीट स्कॅन केल्याशिवाय गेट उघडणार नाही. या निर्णयामुळे विनातिकीट प्रवाशांना अटकाव होणार असून स्थानकावरील गर्दीचे नियोजन प्रभावीपणे होईल.

आतापर्यंत मेट्रो स्थानकांवरील एएफसी गेट्स नेहमी उघडे असायचे. एखादा प्रवासी तिकीट स्कॅन करायचा, तेव्हा हिरवा दिवा लागायचा आणि प्रवेश मिळायचा. केवळ तिकीट अवैध असल्यास किंवा स्कॅन न केल्यास हे गेट्स बंद व्हायचे. मात्र, आता ही यंत्रणा पूर्णपणे बदलण्यात आली असून हे गेट्स आता कायम बंद राहतील. प्रवाशांनी क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सअॅप तिकीट यशस्वीरीत्या स्कॅन केल्यानंतरच हे गेट उघडले जाईल. त्यामुळे प्रवेशही सोपा होणार आहे. मेट्रो स्थानकांवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेट्स आता बंद राहणार असून स्कॅन केल्यावरच उघडणार आहेत.

प्रवाशांची धडक थांबणार; गैरसोय होणार दूर
आधीच्या पद्धतीमुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होत होती. तिकीट नीट स्कॅन झाले आहे की नाही, हे लक्षात न आल्याने अनेक प्रवासी गेटमधून शिरण्याचा प्रयत्न करत असत आणि अशा वेळी अचानक दरवाजे बंद झाल्यामुळे प्रवाशांना धक्का लागायचा जोपर्यंत स्कॅनिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत दरवाजे उघडणार नाहीत. परिणामी, प्रवाशांना कोणतीही इजा न होता शिस्तबद्धरीतीने प्रवास करता येईल.

Web Title : मेट्रो एएफसी गेट टिकट स्कैन करने पर ही खुलेंगे, नया नियम!

Web Summary : पिंपरी मेट्रो ने एएफसी गेट संचालन में बदलाव किया। अब टिकट स्कैन करने के बाद ही गेट खुलेंगे, जिससे किराया चोरी रुकेगी। इससे यात्रियों का सुगम प्रवाह सुनिश्चित होगा और आकस्मिक टक्करें कम होंगी।

Web Title : Metro AFC Gates Open Only After Ticket Scan, New Rule!

Web Summary : Pimpri Metro changes AFC gate operations. Gates now open only after ticket scan, preventing fare evasion. This ensures smoother passenger flow and reduces accidental gate collisions.