पुणे: पुणेमेट्रोने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ऑफर दिली असून, केवळ २० रूपयांमध्ये ‘वन पुणे कार्ड’ देत आहे. ही ऑफर १ ते ८ मार्च दरम्यान सर्व महिलांना मेट्रोमध्ये प्रवास करताना मिळणार आहे. पुणे मेट्रोकडून ‘पुणे वन कार्ड’ सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी दिलेले आहे. या कार्डची किमंत ११८ रूपये असून, ते केवळ २० रूपयांमध्ये महिलांना उपलब्ध होणार आहे. या कार्डमुळे मेट्रोतील प्रवासात सवलत मिळेल.
मेट्रोत जाताना केवळ कार्ड स्वाइप केले की, आतमध्ये प्रवेश मिळतो. रिचार्ज करणे देखील सोपे आहे. सर्व मार्गांवर एकच कार्ड चालते आणि हे इको-फ्रेंडली देखील आहे. त्यामुळे महिलांनी या कार्डचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. १ ते ८ मार्च दरम्यान मेट्रोतून प्रवास करताना सोशल मीडियावर #SheMovesWithMetro हा हॅशटॅग असणार आहे.