पुणे मेट्रोकडून महिलांसाठी प्रवासात खास ऑफर; १ ते ८ मार्च दरम्यान प्रवास करताना मिळणार सवलत
By श्रीकिशन काळे | Updated: February 28, 2025 17:43 IST2025-02-28T17:41:42+5:302025-02-28T17:43:11+5:30
Pune Metro Women's Day Special Offer:मेट्रोत जाताना केवळ कार्ड स्वाइप केले की, आतमध्ये प्रवेश मिळतो. रिचार्ज करणे देखील सोपे असून सर्व मार्गांवर एकच कार्ड चालते

पुणे मेट्रोकडून महिलांसाठी प्रवासात खास ऑफर; १ ते ८ मार्च दरम्यान प्रवास करताना मिळणार सवलत
पुणे: पुणेमेट्रोने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ऑफर दिली असून, केवळ २० रूपयांमध्ये ‘वन पुणे कार्ड’ देत आहे. ही ऑफर १ ते ८ मार्च दरम्यान सर्व महिलांना मेट्रोमध्ये प्रवास करताना मिळणार आहे. पुणे मेट्रोकडून ‘पुणे वन कार्ड’ सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी दिलेले आहे. या कार्डची किमंत ११८ रूपये असून, ते केवळ २० रूपयांमध्ये महिलांना उपलब्ध होणार आहे. या कार्डमुळे मेट्रोतील प्रवासात सवलत मिळेल.
जागतिक महिला दिनानिमित्त पुणे मेट्रोची महिला प्रवाशांसाठी विशेष ऑफर...
— Pune Metro Rail (@metrorailpune) February 28, 2025
पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ई-फॉर्म भरून जवळच्या पुणे मेट्रो स्थानकावरून 'एक पुणे कार्ड' प्राप्त करू शकता
Special Offer for Women Passengers on International Women's Day by Pune… pic.twitter.com/ct8v0wT4OI
मेट्रोत जाताना केवळ कार्ड स्वाइप केले की, आतमध्ये प्रवेश मिळतो. रिचार्ज करणे देखील सोपे आहे. सर्व मार्गांवर एकच कार्ड चालते आणि हे इको-फ्रेंडली देखील आहे. त्यामुळे महिलांनी या कार्डचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. १ ते ८ मार्च दरम्यान मेट्रोतून प्रवास करताना सोशल मीडियावर #SheMovesWithMetro हा हॅशटॅग असणार आहे.