PUNE METRO : ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’मुळे महिलांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:45 IST2025-02-03T14:44:56+5:302025-02-03T14:45:26+5:30

मेट्रो प्रवासादरम्यान कोणतीही अडचण न येता स्तनपान देऊ शकतात व इतर गरजेप्रमाणे त्यांची योग्य काळजी घेऊ शकतात

PUNE METRO 'Matrishakti Nursing Pod' brings relief to women | PUNE METRO : ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’मुळे महिलांना दिलासा

PUNE METRO : ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’मुळे महिलांना दिलासा

पुणे :पुणेमेट्रो जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. स्वच्छ, स्वस्त आणि योग्य सुरक्षा मेट्रोमध्ये ठेवण्यात आला आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपान देण्यासाठी मातृशक्ती नर्सिंग पॉड लावून महिलांसाठी अतिशय गरजेची व्यवस्था पुणे मेट्रोने उपलब्ध केली आहे. यामुळे माता आपल्या बाळांना मेट्रो प्रवासादरम्यान कोणतीही अडचण न येता स्तनपान देऊ शकतात व इतर गरजेप्रमाणे त्यांची योग्य काळजी घेऊ शकतात, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केल्या.

सोशल थम फाऊंडेशनच्या सहयोगाने पुणे मेट्रोने जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्थानकांवर ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’बसविले आहेत. या पॉडचे लोकार्पण रविवारी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र सनेर-पाटील, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक सुजित कानडे, श्याम कुलकर्णी आणि इतर अधिकारी, सोशल थम फाउंडेशनचे अनुश्री जवांजल, अमृता उबाळे, अमोल कारंबे उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सर्व मर्गिका सुरू झाल्यामुळे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे शिवाय महिलांबरोबर लहान मुलेदेखील करत असतात. प्रवासादरम्यान स्तनपान करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी किंवा बाळाचे कपडे बदलण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. अशा वेळी महिलांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत. त्यामुळे पुणे मेट्रो स्थानकावर ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’ लावले आहेत. हे फायद्याचे ठरणार आहे.

अत्याधुनिक नर्सिंग पॉड

हे नर्सिंग पॉड एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजपणे हलवता येऊ शकते. हे पॉड पूर्णपणे वातानुकूलित असून, एका पॉडमध्ये एका वेळेस दोन माता आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकतात, बाळाचे कपडे बदलू शकतात. यामध्ये अग्निरोधक प्रणालीचा वापर केला गेला आहे. तसेच बाळाचे डायपर बदलणे, डायपर डिस्पोजल मशीन, डायपर वेंडिग मशीन व चार्जिंग पॉइंट अशा व्यवस्था केलेल्या आहेत. मातांना आरामदायक अनुभवासाठी या पॉडची रचना असणार आहे. महिलांना निश्चिंतपणे या पॉडमध्ये बाळाची काळजी घेता यावी, यासाठी 'सेफ्टी लॉक' लावण्यात आलेली आहेत. 

Web Title: PUNE METRO 'Matrishakti Nursing Pod' brings relief to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.