Pune Crime: पुण्यात मेट्रोच्या ठेकेदाराला बांबूने मारहाण, गणेशोत्सवात वर्गणी न दिल्याने कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 20:40 IST2023-12-01T20:38:40+5:302023-12-01T20:40:02+5:30

ही घटना डेक्कन जिमखाना भागात घडली....

Pune Metro contractor beaten with bamboo, act of non-payment of registration for Ganeshotsav | Pune Crime: पुण्यात मेट्रोच्या ठेकेदाराला बांबूने मारहाण, गणेशोत्सवात वर्गणी न दिल्याने कृत्य

Pune Crime: पुण्यात मेट्रोच्या ठेकेदाराला बांबूने मारहाण, गणेशोत्सवात वर्गणी न दिल्याने कृत्य

पुणे : गणेशोत्सवात मूर्ती खरेदीसाठी दाेन लाख रुपयांची वर्गणी न दिल्याच्या रागातून मेट्रो पुलाच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला बांबूने मारहाण केली. या प्रकरणी एकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत संतोष मरळ असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. ही घटना डेक्कन जिमखाना भागात घडली.

याबाबत शरद उगले (वय ६२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी डेक्कन ठाण्यात फिर्याद दिली. जंगली महाराज रस्त्यावर झेड ब्रीज जवळील खाऊ गल्लीत मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम एका कंपनीकडून करण्यात येत आहे. मरळ याने पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याकडे गणेश उत्सवात मूर्ती खरेदीसाठी २ लाख रुपये मागितले होते. ही वर्गणी न दिल्याने ताे चिडला होता. दांडके आणि फावड्याने अधिकाऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.

Web Title: Pune Metro contractor beaten with bamboo, act of non-payment of registration for Ganeshotsav