पीएमपीने वाढविलेल्या तिकीट दरामुळे मेट्रोला फायदा;तब्बल आठ लाख मेट्रो प्रवासी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:17 IST2025-08-03T18:16:51+5:302025-08-03T18:17:46+5:30

- जुलै  महिन्यात तब्बल आठ लाख मेट्रो प्रवासी वाढले

pune metro benefits from PMP ticket price hike; Metro ridership increases by nearly eight lakh | पीएमपीने वाढविलेल्या तिकीट दरामुळे मेट्रोला फायदा;तब्बल आठ लाख मेट्रो प्रवासी वाढले

पीएमपीने वाढविलेल्या तिकीट दरामुळे मेट्रोला फायदा;तब्बल आठ लाख मेट्रो प्रवासी वाढले

पुणे : शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी होत आहे. दुसरीकडे पीएमपीने वाढविलेल्या तिकीट दरामुळे मेट्रोला फायदा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मेट्रोचे प्रवासी वाढत आहेत. जूनमध्ये मेट्रोतून ५२ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. आता जुलै महिन्यात ५९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी प्रवास केला असून, मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सर्वाधिक ६० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पीएमपी तिकीट दरवाढ मेट्रोच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.

महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर सेवा सुरू आहे. एका दिवसाला साधारण १ लाख ९३ हजार नागरिक मेट्रोतून प्रवास करत आहेत. शहरातील वाहतूककोंडीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बेस्ट सफर म्हणून प्रवाशांचा कल मेट्रोकडे दिसत आहे. जानेवारीपासून महामेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढताना दिसत आहे. प्रत्येक महिन्यात किंचित प्रवासी संख्या वाढत होती. पण, जून महिन्यात पहिल्यांदाच थेट ४ लाख, तर जुलैमध्ये थेट ८ लाखांनी प्रवासी संख्या वाढली आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर लांब पल्ल्याची प्रवासी सेवा सुरू झाल्याने नागरिकांना फायद्याचे ठरत आहे. शिवाय पीएमपीने तिकीट दर वाढविल्याचा फायदादेखील काही प्रमाणात मेट्रोला होत आहे.

जुलै महिन्यात आठ लाख प्रवासी वाढले 
१ जूनपासून पीएमपीकडून तिकीट दर वाढविण्यात आले, परंतु प्रवासी संख्या १० लाखांवर स्थिर झाली आहे. दुसरीकडे पीएमपी बससंख्या वाढली आहे. शिवाय, नव्या मार्गांवर बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रवासी संख्या वाढली पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही. दुसरीकडे जून महिन्यात चार लाख मेट्रो प्रवासी वाढले, तर जुलै महिन्यात तब्बल आठ लाख मेट्रो प्रवासी वाढणे ही मेट्रोच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.

महिन्यानुसार मेट्रोची प्रवासी संख्या

महिना - प्रवासी संख्या
मार्च - ४४ लाख ८१ हजार

एप्रिल - ४६ लाख ५९ हजार
मे - ४७ लाख ६२ हजार

जून - ५२ लाख ४१ हजार
जुलै - ५९ लाख ५८ हजार

Web Title: pune metro benefits from PMP ticket price hike; Metro ridership increases by nearly eight lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.