पुण्यात मोक्का आरोपी नाना गायकवाड याच्यावर कारागृहात हल्ला; कैद्याने चेहऱ्यावर केले पत्र्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:49 IST2023-02-04T13:46:28+5:302023-02-04T13:49:38+5:30
नाना गायकवाड हा खाेली क्र. १ समाेर बसला हाेता...

पुण्यात मोक्का आरोपी नाना गायकवाड याच्यावर कारागृहात हल्ला; कैद्याने चेहऱ्यावर केले पत्र्याने वार
पुणे : मोक्का कायद्यांतर्गत कारवाईतील आरोपी नाना गायकवाड सध्या येरवडा कारागृहात असून, एका कैद्याने त्याच्यावर हल्ला केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्रं.१ समोर घडली. सुरेश बळीराम दयाळू असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कारागृह हवालदार सुभाष मानसिंग दरेकर यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शुक्रवारी खाेली क्र. १ ते १२ पर्यंतच्या परिसरात काही कैदी साफसफाई करत हाेती. नाना गायकवाड हा खाेली क्र. १ समाेर बसला हाेता. त्यावेळी पाेलिसांची नजर चुकवून आलेल्या सुरेश दयाळू याने लाेखंडी पत्र्याने नाना गायकवाड याच्या उजव्या गालावर वार केले. पाेलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि गायकवाड याला कारागृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलिस पुढील तपास करत आहेत.