तुमचे महापालिकेत नगरसेवक '१०' अन् दावा महापौरपदाचा; पुण्याच्या महापौरांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:30 PM2021-10-14T13:30:48+5:302021-10-14T13:34:18+5:30

पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार असा पक्का विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता

pune mayor murlidhar mohol speak sanjay raut statement In your Municipal Corporation, corporator '10' claims for the post of Mayor | तुमचे महापालिकेत नगरसेवक '१०' अन् दावा महापौरपदाचा; पुण्याच्या महापौरांचा संजय राऊतांना टोला

तुमचे महापालिकेत नगरसेवक '१०' अन् दावा महापौरपदाचा; पुण्याच्या महापौरांचा संजय राऊतांना टोला

Next
ठळक मुद्दे महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा

पुणे : पुढील वर्षी राज्यात महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. पुण्यातही सत्ताधारी नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाची राजकीय मंडळी येत आहेत. पुणे महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. महापौर (mayor) आमचाच अशी वक्तव्य राजकीय नेत्यांकडून केली जात आहेत.

कालच पुण्यातील महावीर जैन महाविद्यालयात ते एका कार्यक्रमा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं होतं. पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार असा पक्का विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्य माध्यमातून संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

''पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा करताय. महत्त्वाकांक्षा ही किमान आपल्या आवाक्यातली तरी असावी असा टोला लगावला आहे. महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील, याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा असेही त्यांनी सांगितले आहे.''

''महाविकास आघाडी (mahavikas aghadi) म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहे. राज्यात गेली दोन वर्षे ठाकरे - पवाराचांच बोलबाला हे आगामी काळातही तो दिसेल. पण आतापर्यंत शिवसेनेचा महापौर झालेला नाही याची आम्हाला खंत वाटत असल्याचे राऊत म्हणाले होते.''

''फडणवीस यांच्या मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी हे नाटक फार गाजलं. रंगमंचावर आम्हालाही वाटतं असं दिल्लीत गेल्यावर त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पहावीत, स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखाना ताकद यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं. असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला होता.'' 

Web Title: pune mayor murlidhar mohol speak sanjay raut statement In your Municipal Corporation, corporator '10' claims for the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app