शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 20:17 IST

गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला असून गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला

किरण शिंदे 

पुणे : पुणेसोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Expressway) इंदापूर जवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील डाळज २ येथे अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे. 

फिरोज कुरेशी, रफिक कुरेशी, इरफान पटेल, मेहबूब कुरेशी आणि फिरोज कुरेशी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अमीर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमी आणि मयत तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने कार निघाली होती. इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील डाळज या ठिकाणाहून ही कार भरगाव वेगात जात असतानाच डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यानंतर गाडी उलटली आणि साधारण पन्नास मीटर ही गाडी जमिनीला घासत पुढे गेली. चार ते पाच वेळेत पलटी झाल्यानंतर ही गाडी सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकली. आणि त्यानंतर नाल्यात पडली. गाडीतील सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. 

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळी गाव घेतली. अपघातग्रस्तांना बाजूला काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता. सर्व अपघातग्रस्त हे तेलंगणा राज्यातील नारायण खेड येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गDeathमृत्यूSolapurसोलापूरcarकारPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर