LPG Gas Crisis : अफवांमुळे पूर्व हवेलीमध्ये गॅस बुकिंगचा भडका; पुरवठा सुरळीत असल्याचा एजन्सीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:55 IST2026-03-12T12:55:22+5:302026-03-12T12:55:44+5:30

- सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर बुक करत असल्याचे दिसून येत आहे.

pune LPG Gas Crisis news gas bookings surge in East Haveli due to rumors; Agency claims supply is smooth | LPG Gas Crisis : अफवांमुळे पूर्व हवेलीमध्ये गॅस बुकिंगचा भडका; पुरवठा सुरळीत असल्याचा एजन्सीचा दावा

LPG Gas Crisis : अफवांमुळे पूर्व हवेलीमध्ये गॅस बुकिंगचा भडका; पुरवठा सुरळीत असल्याचा एजन्सीचा दावा

लोणी काळभोर : सोशल मीडियावरील गॅस पुरवठ्याबाबत अफवांमुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि उरुळी कांचन परिसरात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती स्थानिक गॅस एजन्सीचे राहुल क्षीरसागर यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर बुक करत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातून दररोज ३०० ते ६०० गॅस बुकिंग होत असत; मात्र सध्या ही संख्या वाढून सुमारे १५०० ते ३५०० पर्यंत पोहोचली आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही ठिकाणी तात्पुरता ताण निर्माण होत असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले.

गॅस एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी २१ दिवसांऐवजी २५ दिवसांनंतर करता येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक लवकरात लवकर सिलिंडर रिफिल करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याने वितरणात थोडा विलंब होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले.

सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपुऱ्या माहितीमुळेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अफवा आणि वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून गॅस केंद्रांवरील वाढती गर्दी प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 

Web Title : अफवाहों से हवेली में गैस बुकिंग बढ़ी; आपूर्ति सामान्य होने का दावा

Web Summary : सोशल मीडिया पर अफवाहों के कारण पूर्वी हवेली में गैस बुकिंग में तेजी आई, जिससे दहशत फैल गई। एजेंसियों ने आपूर्ति सामान्य होने का आश्वासन दिया है, हालांकि मांग में अस्थायी वृद्धि हुई है। बुकिंग की बढ़ी हुई आवृत्ति वितरण पर दबाव डालती है, जिससे आपूर्ति को सुचारू बनाए रखने और गलत सूचना को दूर करने के लिए शांति और प्रशासनिक निरीक्षण का आह्वान किया जाता है।

Web Title : Rumors Spark Gas Booking Surge in Haveli; Supply Claimed Smooth

Web Summary : Gas booking surged in East Haveli due to social media rumors, causing panic. Agencies assure supply is normal, despite a temporary demand spike. Increased booking frequency strains distribution, prompting calls for calm and administrative oversight to maintain smooth supplies and dispel misinformation.