LPG Gas Crisis : गॅस टंचाईमुळे मातीच्या चुलींना पुन्हा मागणी; घोडेगावातील कारागिरांना कामाला उभारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:56 IST2026-03-14T15:56:36+5:302026-03-14T15:56:59+5:30

घोडेगावमध्ये आजही कोणतीही यंत्रसामग्री न वापरता पूर्णपणे हाताने मातीच्या चुली तयार केल्या जातात.

pune LPG Gas Crisis Demand for clay stoves rises again due to gas shortage; artisans in Ghodegaon encouraged to work | LPG Gas Crisis : गॅस टंचाईमुळे मातीच्या चुलींना पुन्हा मागणी; घोडेगावातील कारागिरांना कामाला उभारी 

LPG Gas Crisis : गॅस टंचाईमुळे मातीच्या चुलींना पुन्हा मागणी; घोडेगावातील कारागिरांना कामाला उभारी 

घोडेगाव : गॅस टंचाई वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा मातीच्या चुलींना मागणी वाढली असून घोडेगाव येथे चुली बनविणाऱ्या कारागिरांच्या कामाला सध्या चांगलीच उभारी मिळाली आहे. पारंपरिक पद्धतीने माती व शेणापासून बनविल्या जाणाऱ्या चुलींसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे.

सध्या दोन ठिकाणांहून जाळ निघणारी अवलाची चूल सुमारे ३०० रुपयांना, तर एकाच ठिकाणाहून जाळ निघणारी सडीची चूल सुमारे २०० रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय गॅस शेगडीवर ठेवता येणाऱ्या चुली व तंदूरही येथे तयार केले जात आहेत.

घोडेगावमध्ये आजही कोणतीही यंत्रसामग्री न वापरता पूर्णपणे हाताने मातीच्या चुली तयार केल्या जातात. अनेकांना आजही चुलीवरच्या भाकरीची चव आवडत असल्याने घरात गॅस असला तरी ग्रामीण भागातील लोक चुली घेऊन जातात. तसेच गॅस टंचाईमुळे चुलींची मागणी वाढल्याने चुली बनविण्याचे कामही वाढले असल्याचे कारागीर सुधाकर सोमवंशी यांनी सांगितले.

 

Web Title : एलपीजी संकट: मिट्टी के चूल्हों की मांग बढ़ी; घोड़ेगाँव के कारीगरों को काम मिला

Web Summary : ग्रामीण क्षेत्रों में गैस की कमी से मिट्टी के चूल्हों की मांग बढ़ी। घोड़ेगाँव के कारीगरों को पारंपरिक, हस्तनिर्मित चूल्हों के लिए अधिक ऑर्डर मिल रहे हैं। कीमतें ₹200-₹300 तक हैं। गैस उपलब्ध होने पर भी, कई लोग मिट्टी के चूल्हे पर बने भोजन का स्वाद पसंद करते हैं।

Web Title : LPG Shortage Revives Clay Stoves; Ghodegaon Artisans See Increased Demand

Web Summary : Gas scarcity in rural areas boosts demand for clay stoves. Ghodegaon artisans are experiencing increased orders for traditional, handmade stoves. Prices range from ₹200-₹300. Even with gas available, many prefer the taste of food cooked on clay stoves.