लोणीकाळभोर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिला आणि पुरुष तुफान भांडतांना दिसत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील लोणीकाळभोर या भागातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होत असून या व्हिडिओतील महिला पुरुष कुठल्या कारणावरून भांडण करत आहे असा प्रश्नही युजर्स उपस्थित करत आहे. व्हायरल व्हिडिओतील घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत घडली आहे. या व्हिडिओत महिला आणि पुरुष एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. तसेच एकमेकांवर ओरडतांना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रुपांतर वादावादीत झाल्याने दोन गटात दगडफेकीसह धारदार हत्यार व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ३५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केले असून १० जणांना अटक करण्यात आली आहे. सदर घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात असलेल्या इराणी गल्लीत मंगळवार (दि.४) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अमिरु खानु ईराणी (वय ५२, रा. ईराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या मसाट ऊर्फ गुलाम मजलुम ईराणी, हसन ऊर्फ मन्ता मजलूम ईराणी, मोसन लालु ईराणी, मजलूम गुट्टेल हाजीसाब ईराणी, मरिअम मोसन ईराणी, अवनु ऊर्फ अलीरजा राजु ईराणी, महंमद मोसन ईराणी ऊर्फ गोजु, शाजमान ऊर्फ पठाण हाजीसाब ईराणी, राजु हौजी ईराणी, मरीअम मजलूम ईराणी, सिमु हाजीअली ईराणी, ममाई ऊर्फ फिल्मा हाजीअली ईराणी, नफीसा ऊर्फ मसाट फेरोज ईराणी, नफीस मसाट ऊर्फ गुलाम ईराणी, शब्बीर जावेद जाफरी ईराणी व इतर इसम (सर्व रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, पुणे) यांच्यावर वि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मजलूम हाजीअली सय्यद (ईराणी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमिरु खानु ईराणी, सिवी मंजुरी ईराणी, किमला मंजूर ईराणी, फातु मंजुर ईराणी, मुक्तार सय्यद ईराणी, अली अक्रम ईराणी, जीनद अली ईराणी, ईसफ सलीम ईराणी, सोहरा ईसफ ईराणी, शबाना अक्रम ईराणी, सकीना अक्रम ईराणी, मोहंमद नासर ईराणी, हैदर सलीम ईराणी, जेहरा जाफर ईराणी, मोहंमद इम्रान ईराणी, हैदर अली ईराणी, आब्बास ईसफ ईराणी, कासीम सलीम ईराणी, मोहंमद सय्यद ईराणी व इम्रान फेरोज ईराणी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिरु ईराणी याचा चष्माविक्रीचा धंदा आहे. तर मजलूम सय्यद हे रिक्षाचालक आहे. या दोघांमध्ये लहान मुलांच्या भांडणांवरून वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात दोन्हीकडील लोकांनी विरुद्ध गटातील लोकांना लोखंडी रॉड, धारदार हत्यार व दगडांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, महेश चव्हाण, संदीप जोगदंड, निशा कोंढे, प्रशांत कळसकर, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, मंगेश नानापुरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.