पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पुण्यात गिरीश बापटांचा मोहन जोशींना धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 23:21 IST2019-05-23T23:20:08+5:302019-05-23T23:21:01+5:30
महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत होते.

पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पुण्यात गिरीश बापटांचा मोहन जोशींना धोबीपछाड
पुणेःकाँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 2014पासून शत-प्रतिशत कमळ फुलले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी लढत बघायला मिळाली. वाहतूक, वाढते शहरीकरण, मेट्रो, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली. महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत होते. मात्र, यात बापटांनी रात्री उशिरा पर्यंत २० फेरीपर्यंत तब्बल ३,०९८४८ इतक्या विजयी मताधिक्क्याने धोबीपछाड दिला.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात २० फेरीनंतर गिरीश बापट यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ६,०४६८७ मते मिळाली असून मोहन जोशी यांच्या पारड्यात २, ९४, ८३९ मते मिळाली आहेत.
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी 5 लाख 69 हजार 825 मतांसह विजय साकारला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 056 मते मिळाली होती. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले होते.