शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

Pune Lockdown : पुणे शहरात ५ दिवसांत २३ हजारांहून अधिक जणांवर कारवाई; विनाकारण घराबाहेर पडलेल्यांची नाही खैर..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:15 PM

नागरिकांना अत्यावश्यक किराणा, दुध, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे...

पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी तो पुन्हा वाढू नये, यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली असून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. गेल्या ५ दिवसात विनाकारण घराबाहेर पडणार्‍या व नियमभंग करणार्‍या तब्बल २३ हजारांवर कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर २३ मार्चपासून पुणे शहरासह राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यात विनाकारण प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर सुरुवातीलचे काही दिवस पोलिसांनी लोकांना समजावून सांगण्यावर भर दिला होता. त्यानंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. गेल्या काही दिवसात पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढू लागली. पोलीस अडवितात, म्हणून अनेक जण कॅबचा वापर करु लागले. रस्त्यावरील मोटारींची संख्याही वाढू लागली. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरुन नाकाबंदीची तपासणी करण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज कम्प, महात्मा गांधी रोड, बंडगार्डन परिसरात फिरुन नाकाबंदीच्या अंमलबजावणीची पाहणी केली. तेथील अधिकारी करत असलेल्या कामाचे कौतुक करुन त्यांना आवश्यक सूचना दिल्या.

गेल्या एप्रिल महिन्यात जवळपास ३० हजार जणांवर कारवाई करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर पुणे शहरातील सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या गुरुवारपासून अधिक कडक अंमलबजावणी करण्यात येऊ लागली. गेल्या गुरुवारी दिवसाला प्रथमच साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दररोज साधारण साडेचार हजार जणांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

नागरिकांना अत्यावश्यक किराणा, दुध, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्यावर येणार्‍या प्रत्येक वाहनांची नाकाबंदीच्या ठिकाणी चौकशी केली जात आहे. बाहेर येण्याचे कारण विचारले जात आहे. त्यामुळे अनेकदा नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांचा रांगा लागलेल्या दिसून येत आहे. रिक्षा, कॅबमधून जाणार्‍यांवरही कारण विचारले जात आहे. .........किरकोळ कारण सांगून घराबाहेर पडणार्‍यांची संख्या गेल्या काही दिवसात वाढलेली दिसून आल्याने कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली आहे. वैध कारणासाठी बाहेर पडल्यांना त्रास होणार नाही. मात्र विनाकारण बाहेर पडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या चार दिवसांपासून दर रोज साधारण ४ हजार जणांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका