Pune Lock down 2.0 : लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेसाठी ऑटो रिक्षासह ' ही ' सुविधा असणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 08:42 PM2020-07-11T20:42:09+5:302020-07-11T20:43:24+5:30

तुम्हाला वैद्यकीय उपचारासाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी ' या ' व्हाट्स अप क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

Pune Lock down 2.0: Rickshaws and cars available for medical treatment and emergency services during lockdown | Pune Lock down 2.0 : लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेसाठी ऑटो रिक्षासह ' ही ' सुविधा असणार उपलब्ध

Pune Lock down 2.0 : लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेसाठी ऑटो रिक्षासह ' ही ' सुविधा असणार उपलब्ध

Next
ठळक मुद्देरेल्वे स्टेशन आणि विमानतळासाठी बुक 2 राईड सेवा

पुणे : येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचे काळात तातडीचे वैद्यकीय उपचार तसेच अत्यावश्यक सेवेकरीता शहरात प्रवास करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देेण्यात येणार आहे. त्यासाठी ९८५९१९८५९१ हा व्हॉटसअप मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॉटसअप द्वारे संपर्क साधल्यावर प्रवास कोणत्या कारणाकरीता करणार आहे, याची माहिती देऊन हे कारण अत्यावश्यक सेवेत बसत आहे, अशा कारणाकरीता ऑटो रिक्षा उपलब्ध होणार आहे.

ही आॅटो सेवा तातडीचे वैद्यकीय उपचाराचे अनुषंगाने व अत्यावश्यक सेवेकरीता जा ये करत असलेल्या नागरिकांकरिता सुविधा उपलब्ध असणार आहे.

ही सेवा देणारे रिक्षा चालक यांचे वय ४५ वर्षाचे आतील असून आॅटो रिक्षा ही सॅनिटाईज केलेली व प्रवास करता रिक्षाचालक व प्रवासी यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच रिक्षा हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्याबाबत रिक्षा चालक यांना सूचना देण्यात येणार आहेत.
मागील लॉकडाऊनचे कालावधीत २२ हजार अत्यावश्यक सेवेचे कॉलधारक नागरिकांना आॅटो उपलब्ध करुन दिल्याने त्यांनी प्रवास केलेला आहे. ज्या नागरिकांना अत्यावश्यक तातडीचे कारणाकरीता व्हॉटसअप मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सेवा घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

020-66100100
रेल्वे स्टेशन, विमानतळासाठी बुक २ राईड सेवा

पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन करण्यात येत असला तरी पुण्यात येणारे व पुण्यातून जाणाऱ्या रेल्वे, विमान प्रवाशांसाठी बुक २ राईड ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ महाराष्ट्र कॅब सर्व्हिसच्या वतीने पुणे विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी ही कॅब सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी ०२०-६६१००१०० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. सोयीस्कर दर आणि सॅनिटाईज केलेली कार व कारचालक व प्रवाशांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.

Web Title: Pune Lock down 2.0: Rickshaws and cars available for medical treatment and emergency services during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.